शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

महिन्याची नोटीस न देताच कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 6:52 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून ७५ टक्के हजेरी न भरल्याप्रकरणी परीक्षा सुरू असताना १० विद्यार्थ्यांना पेपर देण्यास मज्जाव केला गेला.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून ७५ टक्के हजेरी न भरल्याप्रकरणी परीक्षा सुरू असताना १० विद्यार्थ्यांना पेपर देण्यास मज्जाव केला गेला. नवीन विद्यापीठ कायद्यातील कलम ७५ नुसार विद्यार्थ्यांना एक महिन्यांची नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची बुधवारी मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी भेट घेऊन कारवाईबाबत तक्रार केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी एक महिन्यांची मुदत दिली का, याबाबत संचालकांनी खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ७५ टक्के हजेरीच्या नियम लावण्यास सुरुवात करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. मराठी विभागाकडून हा कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.मराठीच्या १० विद्यार्थ्यांनी एका विषयाची परीक्षा दिल्यानंतर अचानक त्यांना परीक्षा देण्यापासून रोखण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजीची भावना निर्माण झाली आहे. मराठी विभागामध्ये तिसºया सत्रात शिकणाºया विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती भरली नाही. त्यामुळे त्यांना पेपर देण्यास मनाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु समितीने परीक्षा सुरू होण्यापूर्वीच याबाबतचा निर्णय देणे आवश्यक असताना एक पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढचे पेपर देण्यास मनाई केली आहे.समितीने नियमानुसार विद्यार्थ्यांना एक महिन्याची नोटीस देणे आवश्यक असताना ती न देण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठाने मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ