शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

हाॅटेल, पब रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्यास कारवाई होणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 10:57 IST

मध्यरात्रीनंतर हॉटेल, तसेच पब सुरू ठेवण्यात येत असून, आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या

पुणे: शहरातील रेस्टॉरंट बार, रुफटॉप हॉटेल, बार-रेस्टॉरंट आणि पब चालकांसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली तयार केली आहे. नियमावलीचे पालन न करता अटी व शर्थीचे उल्लंघन करुन रात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही नियमावली लागू करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर कायमस्वरूपी निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

शहरात मध्यरात्रीनंतर हॉटेल, तसेच पब सुरू ठेवण्यात येत असून, आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली तयार केली आहे. नियमावलीत हॉटेल, पब चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांकडून नियमित तपासणी करण्यात येणार आहे. साउंडचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त नसावा. रहिवासी भागातील पब, हॉटेल चालकांनी सामान्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काय आहे नियमावली

* नियमभंग करणाऱ्या परमिट रुम, हॉटेल, पब चालकांवर कलम १४४ नुसार कारवाई होणार.* रात्री दहानंतर मोठ्या आवाजात साऊंडचा वापर केल्यास कारवाई.

* हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार, किंवा डीजे येणार असल्यास परवानगी आवश्यक.* विदेशी कलाकार कधी येणार, याची पासपोर्टसंदर्भातील सर्व माहिती द्यावी लागणार.

* पोलिस परवानगीनंतरच आयोजकांना तिकीट व विक्री तसेच प्रसिद्धी करता येणार.* ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी प्रसाधनगृह वगळता हॉटेलच्या सर्व भागांत सीसीटीव्ही बंधनकारक राहील.

* हॉटेल प्रवेश व बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही आवश्यक.* सीसीटीव्ही चित्रीकरणातील रेकॉर्डिंगसाठी दोन डीव्हीआर असणे आवश्यक.

* बाऊंन्सर, कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी बंधनकारक.* एखाद्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी संबंधित पोलिस उपायुक्तांची परवानगी बंधनकारक.

* १८ वर्षांखालील मुलांना मद्यविक्री करता येणार नाही. नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार.* हॉटेलमध्ये धूम्रपानासाठी (स्मोकिंग झोन) असणे गरजेचे. अन्य ठिकाणी धूम्रपान करता येणार नाही.

* हुक्का, शिशा विक्रीवर बंदी, उल्लंघन केल्यास कडक कारवाई.

टॅग्स :PuneपुणेhotelहॉटेलHealthआरोग्यpollutionप्रदूषण