शिवाजीनगर, आपटे रस्ता येथील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 15:17 IST2018-01-10T15:16:00+5:302018-01-10T15:17:59+5:30
महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६च्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यात सुमारे १८ हजार ०३२ चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

शिवाजीनगर, आपटे रस्ता येथील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई
ठळक मुद्दे सुमारे १८ हजार ०३२ चौ. फूट क्षेत्र करण्यात आले मोकळे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६च्या वतीने कारवाई
पुणे : महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६च्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यात सुमारे १८ हजार ०३२ चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
शिवाजीनगर येथील भांडारकर रस्ता, एफ. सी. रस्ता, आपटे रस्ता येथील हॉटेल डेक्कन यांचे ९३२ चौ. फूट, लाऊंज कॅफे यांचे २४५० चौ. फूट, मॅलिकू हुक्का यांचे २५०० चौ. फूट, आपटे मंगल कार्यालय यांचे ६६०० चौ. फूट हॉटेल श्रृती मंगल कार्यालय यांचे ४५० चौ. फूट, हॉटेल रामी ग्रँड यांचे २०० चौ. फूट, कल्पतरू हेल्थ प्रो. यांचे ६००, हॉटेल प्राइड यांचे २५०० चौ. फूट, हॉटेल कोरोनेट यांचे १४०० चौ. फूट या ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात आली.