निवडणूक कामात हालगर्जीपणा केल्याप्रकरणी शिक्षकावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:35+5:302021-02-05T05:12:35+5:30
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सोनवडी येथील वार्ड क्रमांक २ अ चे मतदान केंद्राध्यक्ष नानासाहेब शिंदे ...

निवडणूक कामात हालगर्जीपणा केल्याप्रकरणी शिक्षकावर कारवाई
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सोनवडी येथील वार्ड क्रमांक २ अ चे मतदान केंद्राध्यक्ष नानासाहेब शिंदे हे मतदान अधिकारी १ यांच्या जागेवर बसून होते तसेच एका महिलेचे मतदान त्यांनी स्वतः जाऊन केले असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी समक्ष जाऊन पाहणी करून जबाब नोंदवीले होते. तर झोनल अधिकारी निर्मला राशिनकर यांनीही या घटनेचा अहवाल तहसीलदार संजय पाटील यांना सादर केला होता. सोनवडी ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी ना. ल. सासवडे यांनी देखील तहसीलदार दौंड यांना दिलेल्या पत्रात नानासाहेब शिंदे यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान तहसीलदार यांनी नानासाहेब र शिंदे यांचा खुलासा मागविला होता. त्यानुसार पाटील यांनी शिंदे यांचा खुलासा अमान्य करत त्यांनी निवडणूक कामात व शासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे यांना प्राधिकृत केले आहे.
तसेच, नानासाहेब शिंदे हे दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयात पॅरोलवर असताना महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी शिंदे हे पॅरोलवर आहे त्यांची माहिती निवडणूक आयोगाला कळविले नाही. परिणामी, दौंड तालुका कला व वाणिज्य प्राचार्यांच्या चौकशीचे आदेश तहसीलदार यांनी गटशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे यांना दिले आहेत.