शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला पाणी न देणाऱ्यां अधिकाऱ्यांवर कारवाई करावी : जलसंपदाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:22 IST

यंदा धरणात शंभरटक्के पाणीसाठा असूनही, नियोजना अभावी शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही

ठळक मुद्दे जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशची अंमलबजावणी व्हावी

पुणे : महानगरपालिकेने पाणी नियंत्रण यंत्रणा हस्तांतरीत न केल्यामुळे जलसंपत्ती नियामन प्राधिकरण विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी बारामतीमधील शेतकऱ्याने जलसंपदा विभागाकडे केली आहे. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. बारामती तालुक्यातील उंडवडी गावचे माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी ही तक्रार जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाला महानगरपालिकेने पाणी नियंत्रण यंत्रणा हस्तांतरीत केलेली नाही. मुठा कालवे यांनीही महापालिकेला पाणी नियंत्रण करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभागाने देखील पाणीवापर नियंत्रित करण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. त्यास महापालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे लेखी उत्तर खडकवासला पाटबंधारे विभागाने तक्रारदार जराड यांना दिले आहे. जलसंपत्ती प्राधिकरणाने महापालिकेस ११.५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कोटा मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. पुर्वी खरीप, रब्बी आणि उन्हाळी आवर्तन दिली जात होती. यंदा धरणात शंभरटक्के पाणीसाठा असूनही, नियोजना अभावी शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे जराड यांनी जलसंपदा विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीWaterपाणीFarmerशेतकरीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका