हिंदु जनजागृती समितीचा कृतीआराखडा; पुण्यात झाले प्रांतिय अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:09 IST2018-01-11T15:02:12+5:302018-01-11T15:09:01+5:30
हिंदु जनजागृती समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये गोरक्षण, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, धर्मांतरण आणि हिंदू राष्ट्राची मूलभूत संकल्पना या विषयांवर विचारमंथन करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीचा कृतीआराखडा; पुण्यात झाले प्रांतिय अधिवेशन
पुणे : हिंदू जनजागृती समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये गोरक्षण, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, धर्मांतरण आणि हिंदू राष्ट्राची मूलभूत संकल्पना या विषयांवर विचारमंथन करण्यात आले. व्यापक स्तरावर धर्मप्रसारासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे.
जात पात विरहीत हिंदू संघटन, धर्मशिक्षण या उद्देशाने हडपसर, आळंदी आणि भोर परिसरात धर्म जागृती सभा घेण्याचे तसेच धर्मशिक्षण वर्ग सुरु करण्याचे ठरविण्यात आले आहे. सनातनच्या सद्गुरु कुमारी स्वाती खाड्ये यांनी साधनाविषयक मार्गदर्शन केले. तर पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध संघटनांचे ७६ कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले होते. आळंदी येथील देवीदास धर्मशाळेचे अध्यक्ष ह. भ. प. निरंजनशास्त्री कोठेकर, हिंदू विधिज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, अधिवक्ता निलेश सांगोलकर, समीर पटवर्धन, अभिजीत देशमुख, पराग गोखले, युथ फॉर पनून कश्मिरचे राहुल कौल, चंद्रकांत वरघडे, विश्व हिंदू परिषदेचे धनंजय गावडे आदींनी मार्गदर्शन केले.
लोकशाही आणि निधर्मी शासन प्रणालीमध्ये हिंदूचे दमन होत आहे. हिंदू राष्ट्राची मागणी हा हिंदूंचा संविधानिक अधिकार आहे. सर्वपक्षीय सरकारांनी काश्मिरी हिंदूंच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. यासोबतच भ्रष्टाचार, दायित्वशून्यता याविषयी गट चर्चा घेण्यात आली.