लोकमत न्यूज नेटवर्कशिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलीस ठाणे हद्दीत असलेले बेशिस्त वाहनचालक, विनापरवाना वाहन चालविणे, सिटबेल्ट न लावणे, काळ्या काचा करणे अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम शिक्रापूर पोलिसांनी सुरू केली आहे. एका दिवसात दीडशे वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ही मोहीम सुरू केली असून, त्यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले, गणेश वारुळे, पोलीस नाईक विलास आंबेकर, दत्तात्रय शिंदे, अनिल जगताप, संदीप जगदाळे, ब्रह्मा पोवार, गोरक्ष भामगर, दिलीप शिंदे, राजेंद्र मदने, पुनाजी जाधव, विनायक नागरगोजे यांनी शिक्रापूर येथील चाकण चौक व पाबळ चौक, तळेगाव रोड तसेच येथील महामार्गावर बेशिस्त वाहनचालक, विनापरवाना वाहन चालविणे, बिगरहेल्मेट वाहन चालविणे, बेशिस्त पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहतूक, ट्रिपलसिट, सिटबेल्ट न लावणे, काळ्या काचा करणे अशा वाहनांवर कारवाई सुरू केली.
एका दिवसात दीडशे वाहनांवर कारवाई
By admin | Updated: May 10, 2017 03:52 IST