शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | बावीस गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 15:01 IST

पोलिसांची चाहूल लागताच आरोपी लखन भोसलेने पळ काढला होता...

सांगवी (बारामती) : एकूण सहा पोलीस ठाण्यात मोक्का, खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयातील कुख्यात आरोपीला पुणे ग्रामीण पोलीसांनी बारामती तालुक्यातील घाडगेवाडी येथून पाठलाग करत अटक केली आहे. त्यानुसार आरोपी भोसले हा मंगळवार( दि. 15) रोजी घाडगेवाडी, (ता. बारामती) येथे एका घरासमोर उभा दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी लखन भोसलेने पळ काढला होता. साधारण एक किलोमीटर पाठलाग करून अखेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.

लखन ऊर्फ महेश पोपट भोसले, रा. वडगाव जयराम स्वामी, (ता.खटाव, जि.सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला पुणे येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार अभिजीत एकशिंगे व स्वप्निल अहिवळे यांना आरोपी लखन ऊर्फ महेश भोसले हा घाडगेवाडी, (ता. बारामती) आल्याची गोपनीय माहिती मिळाली खबर होती. त्यानुसार आरोपी भोसले हा मंगळवार( दि. 15) रोजी घाडगेवाडी, (ता. बारामती) येथे एका घरासमोर उभा दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी भोसलेने पळ काढला होता. साधारण एक किलोमीटर पाठलाग करून अखेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला. स्थानिक गुन्हे शाखेसह, बारामती तालुका पोलीस ठाणे, माळेगाव पोलीस, वडगाव निंबाळकर पोलिसांनी सापळा रचत आरोपीचा पाठलाग करत अटक केली. 

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अमित पाटील, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, मुकुंद कदम, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, हिरालाल खोमणे, हृदयनाथ देवकर, पोलीस मित्र दादा कुंभार, राम कानगुडे, अमोल नरुटे, दीपक दराडे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे यांची पथके तयार करून आरोपीच्या मुसक्या आवळया आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBaramatiबारामतीPoliceपोलिस