"बदनामी केली म्हणून कारवाई, पदाचा गैरवापर नाही" रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 02:01 PM2023-12-07T14:01:06+5:302023-12-07T14:25:11+5:30

चार जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

"Action for defamation, not abuse of office" explained by Rupali Chakankar | "बदनामी केली म्हणून कारवाई, पदाचा गैरवापर नाही" रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण

"बदनामी केली म्हणून कारवाई, पदाचा गैरवापर नाही" रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लिल कमेंट केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींवर कारवाई केली होती. ही कारवाई करण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा होतोय गैरवापर केला, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रदीप कणसे केला. त्याबद्दल चाकणकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, माझ्यावर फेसबुकवर अश्लील कमेंट करण्यात आली. त्याबद्दल माझ्या बंधूंनी सायबर पोलिसात तक्रार दिली होती. जे दोषी आढळले त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली आहे. माझी बदनामी करता म्हणून कारवाई होणे गरजेचे आहे. यात पदाचा गैरवापर येतोच कुठे, असा सवालही त्यांनी विचारला.

पुढे बोलताना कणसे म्हणाले, वैचारिक भूमिकेला विरोध केला म्हणून कायद्याचा गैरवापर करत पोलिस चाकणकर यांनी प्रशासनाकडून चौकशीसाठी नोटीस पाठवली. माध्यमांपर्यंत पोलिसांनी चुकीची माहिती पाठवून नाहक सामाजिक बदनामी केली, असंही ते म्हणाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्द्ल सोशल मीडियावर अश्लील पोस्ट टाकून त्यांची जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक आरोपी मानसिक रुग्ण असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.

अजितदादाच विकास करू शकतील -

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिकांनी आज अधिवेशनात हजेरी लावली. त्याबद्दल चाकणकरांना विचारले असता त्या म्हणाल्या, राज्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटतं की आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की राज्याचा विकास अजितदादा करू शकतील, म्हणून सर्व लोकप्रतिनिधी अजित दादांबरोबरच आहेत, असंही त्या म्हणाल्या. सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी विकासासाठी अजित दादांना  समर्थन दिलं आहे.

Web Title: "Action for defamation, not abuse of office" explained by Rupali Chakankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.