वाळूचोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई

By Admin | Updated: February 1, 2016 00:45 IST2016-02-01T00:45:47+5:302016-02-01T00:45:47+5:30

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाभूळगावच्या हद्दीत शनिवारी (दि. ३०) रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत महसूल विभागाने वाळूचोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.

Action on drunken vehicles | वाळूचोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई

वाळूचोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई

इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाभूळगावच्या हद्दीत शनिवारी (दि. ३०) रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत महसूल विभागाने वाळूचोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. सात वाहनातील २० ब्रास वाळू जप्त केली. वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिब्रास ५१ हजार ७०० रुपयांप्रमाणे १० लाख ३४ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिली.
तहसीलदार सूर्यकांत येवले, पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी संतोष अनगरे, अविनाश डोईफोडे, एस. बी. माने, अजित पाटील, शिवाजी बिराजदार, तलाठी राजू तागवाले, तलाठी निलंजन वानखेडे, रवींद्र पारधी, शिवाजी खोसे, भिसे, विनायक कुलकर्णी, ईश्वर कोळी, राजाभाऊ पिसाळ, मनीषा वडेपल्ली, फौजदार संजय नीलपत्रेवार, पोलीस हवालदार सुभाषचंद्र दळवी, सचिन बोराटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
(वार्ताहर)शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारवाई सुरू केली. वाहने ताब्यात घेतली. वाहनाचे चालक पळून गेले. वाहने पुन्हा सुरू होऊ नयेत यासाठी ‘इंजिन लॉक’ केली. जेसीबीच्या साहाय्याने दोन वाहने इंदापूर पोलीस ठाण्यात पाठविली. उर्वरित पाच वाहनांच्या टायरमधील हवा सोडून दिली. वाहनांमधील वाळू रस्त्यावर खाली केली. वाहनांमधील खाली केलेली वाळू पंचनामे करून पोलीस पाटील अनिल भांगे यांच्या ताब्यात दिली आहे.
- सूर्यकांत येवले, तहसीलदार

Web Title: Action on drunken vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.