शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात ५३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 14:43 IST

३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरतात... 

ठळक मुद्देपुणे शहर वाहतूक पोलीस : चार दिवसांपासून मोहीम सुरूप्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत सायंकाळपासून बदलकोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा बंदोबस्त राहणार

पुणे : शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व वाहतूक सुरळीत व सुरक्षित चालण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांकडून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यास गेल्या चार दिवसांपासून सुरुवात केली आहे़. त्यात सोमवारपर्यंत तब्बल ५३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे़ ३१ डिसेंबर व १ जानेवारी दरम्यान पहाटे ५ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे़. अपर पोलीस आयुक्त डॉ़ संजय शिंदे यांनी सांगितले की, मद्यप्राशन करून वाहन चालविणाºया वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम चालू केली आहे़. ..........प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत सायंकाळपासून बदल

पुणे कॅम्प भागात सायंकाळी ६ वाजेपासून गर्दी संपेपर्यंत प्रमुख रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे़. गोळीबार मैदान चौकातून कॅम्पमध्ये येणाºया रस्त्यावरील वाय जंक्शनवरून महात्मा गांधी रोडकडे जाणारी वाहतूक १५ आॅगस्ट चौकात बंद करण्यात येऊन ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे़. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात येणार आहे़. .......

व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ती वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल़ इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ती वाहतूक लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ती ताबूत स्ट्रीट रोडमार्गे पुढे सोडण्यात येणार आहे़. .....शिवाजी रोडवरील वाहतुकीत नववर्षी बदलनवर्षानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात़ त्यामुळे १ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत शिवाजी रस्त्यावर चारचाकी वाहने आणि सर्व प्रकारच्या बसेस वाहतुकीत बंदी करण्यात येणार आहे़ वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा़ जंगली महाराज रस्त्यावरून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाºया चारचाकी व बसगाड्यांनी जंगली महाराज रोडने जावे़.........२९ सिग्नल पहाटेपर्यंत सुरू राहणार३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता असते़. हे लक्षात घेऊन प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल गर्दी संपेपर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे़. पुणे विद्यापीठ चौक, नळस्टॉप चौक, फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड, टिळक रोडवरील सर्व चौक, खंडूजीबाबा चौक, टिळक चौक, जेधे चौक, राजाराम पूल चौक, सादल बाबा चौक,  सिंहगड रोड जंक्शन, कोरेगाव पार्क जंक्शन, चर्च चौक, खडकी, जहांगीर चौक, कॅम्पमधील प्रमुख चौकातील सिग्नल पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ..........नववर्षाचे स्वागत नागरिकांनी उत्साहात आणि वाहतूकीचे सर्व नियम पाळून करावे़ मद्यप्राशन करुन वाहन चालविताना स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये़. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहेच. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करुन नव्या वर्षाचा जल्लोष करावा़ - डॉ़ के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे... 

टॅग्स :Puneपुणेliquor banदारूबंदीPoliceपोलिस