शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नववर्षाचे स्वागत करताना ८७३ तळीरामांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 22:06 IST

नववर्ष साजरे करताना मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ८७३ तळीरामांवर पुणे शहर पोलिसांनी रात्री कारवाई केली आहे. 

पुणे : नववर्ष साजरे करताना मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ८७३ तळीरामांवर पुणे शहर पोलिसांनी रात्री कारवाई केली आहे. त्यात ६९३ दुचाकीस्वार असून, १८० तीन व चारचाकी वाहनचालकांचा समावेश आहे. वर्षभरात दारू पिऊन वाहन चालविणा-या १४ हजार ९७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.३१ डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन वाहन चालविणा-या तळीरामांचे लायसन्स जप्त करण्यात आले असून, त्यांच्यावर येत्या ३ जानेवारीपर्यंत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून समन्स पाठविले जाईल. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचे लायसन्स रद्द करण्याविषयी प्रादेशिक परिवहन विभागाला शिफारस केली जाईल. यादरम्यान, ते वाहन चालविताना आढळल्यास ते विना परवाना वाहन चालवित असल्याचे समजून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.काही वर्षापूर्वी ३१ डिसेंबरला नववर्ष साजरा करताना वेगाने वाहने चालविल्याने प्राणघातक अपघात होत असत. वाहतूक पोलिसांकडून केली जाणारी जनजागृती आणि ठेवण्यात येत असलेला बंदोबस्त यामुळे या वर्षी ३१ डिसेंबरला एकही प्राणांतिक अपघात झालेला नाही. २०१७ मध्ये एकूण २४७ प्राणघातक अपघात होऊन त्यामध्ये २६१ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये एकूण २४० प्राणघातक अपघात होऊन त्यात २५२ जणांचा मृत्यू झाला असून, गतवर्षीपेक्षा प्राणांतिक अपघात ७ ते कमी झाले असून त्यात मृतांची संख्या ९ ने कमी झाली आहे.नव्या वर्षात हे अपघाताचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निश्चय पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केला आहे. त्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करून व इतर वाहतूक नियमांचे पालन करून सर्व नागरिकांनी रस्ता सुरक्षेबाबत आपली जबाबदारी समजून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. ३१ डिसेंबर रोजी वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियमभंग करणा-या वाहनचालकांवर केलेल्या परिणामकारक कारवाईमुळे व लावण्यात आलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे ३१ डिसेंबर सारख्या महत्वाच्या दिवशी शहरामध्ये वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यात आली होती. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना केलेल्या सहकार्याबद्दल पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.कोरेगाव पार्क परिसरात सर्वाधिक तळीरामअनेक क्लब, पब, पंचतारांकित हॉटेल कोरेगाव पार्क परिसरात आढळून येतात. या ठिकाणी शुक्रवारी, शनिवारी मध्यरात्री अनेकदा या हॉटेल, बार, पबमध्ये आलेल्या ग्राहकांमुळे वाहतूक कोंडीचा अनुभव येतो. त्यात अनेक दारू पिऊन वाहन चालविणारे आढळून येतात. कोरेगाव पार्क वाहतूक विभागाने वर्षभरात सर्वाधिक १२६१ तळीरामांवर कारवाई केली आहे. त्या खालोखाल हडपसर ९८१, दत्तवाडी ९३७, येरवडा ९१० अशी कारवाई करण्यात आली आहे.वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी पाठवा, बक्षीस मिळवाशहरातील वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे पाठवून बक्षीस जिंकण्याची संधी वाहतूक पोलिसांनी नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. पुणे पोलिसांनी सतर्क पुणेकर नावाचे अ‍ॅप नागरिकांना प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिला आहे. ते अ‍ॅप जास्तीतजास्त नागरिकांनी डाऊनलोड करुन शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांच्या तक्रारी या अ‍ॅपच्या माध्यमातून कराव्यात़ जे नागरिक जास्तीत जास्त वाहतूक नियमभंगाबाबत तक्रारी या अ‍ॅपद्वारे पाठवतील, तयांना योग्य ते बक्षीस देण्यात येणार आहे, असे वाहतूक पोलिसांनी जाहीर केले आहे.

टॅग्स :Puneपुणे