शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या तब्बल 400 पर्यटक वाहनांवर कारवाई; दोन लाख दंड वसूल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 13:56 IST

वर्षाविहाराला येणार्‍या पर्यटकांच्या वाहनांमुळे शनिवार व रविवार ह्या दोन्ही दिवशी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली.

ठळक मुद्देभुशी धरणावर देखील  पर्यटकांना सुचना देण्याकरिता स्पिकर व्यवस्था

लोणावळा : शनिवार व रविवारी पर्यटनासाठी लोणावळ्यात येऊन हुल्लडबाजी करत वाहन चालविणारे तसेच विविध प्रकारे वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या तब्बल 400 वाहनांवर दंडात्मक कारवाई करत लोणावळा शहर पोलिसांनी जवळपास दोन लाख रुपयांचा दंड केला.     वर्षाविहाराला येणार्‍या पर्यटकांच्या वाहनांमुळे शनिवार व रविवार ह्या दोन्ही दिवशी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली. यावेळी वाहतुक नियमांची पायमल्ली करत विरुध्द दिशेने वाहने पुढे आणत वाहतुक कोंडीत भर घालणारे वाहन चालक, दुचाकी वरुन ट्रिपल सिट जाणारे पर्यटक, पोलिसांचा इशारा न मानने, लायसन्स जवळ न बाळगणे, धोकादायक पध्दतीने वाहन चालविणे, नो पार्किंगच्या जागेवर वाहने पार्किंग करणे असे प्रकार करणार्‍या जवळपास 400 वाहनांवर लोणावळा शहर पोलीसांनी ई चलनद्वारे कारवाई करत त्यांना जवळपास दोन लाखांचा दंड केला.    लोणावळा शहरात व पर्यटनस्थळांकडे जाणार्‍या मार्गावर पोलिसांनी स्पिकरद्वारे पर्यटकांना वाहतुक नियमन व पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते येथील वाहतुक कोंडी याबाबत सुचना देण्याची व्यवस्था केली आहे. वारंवार सुचना देऊन पर्यटक नियमांचा भंग करत असल्याने कारवाईचा बडगा उचलावा लागला असे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी सांगितले. भुशी धरणावर देखील  पर्यटकांना सुचना देण्याकरिता स्पिकर व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांनी पर्यटनस्थळांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी धांगडधिंगा करु नये, दिलेल्या सुचनांचे पालन करावे, पर्यटनस्थळांवर मद्यप्राशन करु नये, मद्यप्राशन करुन वाहने चालवू नयेत अशा सुचना देणारे फलक देखील जागोजागी लावण्यात आले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसParkingपार्किंगtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरtourismपर्यटन