दिग्गज अभिनेत्याचे वागणे साधे

By Admin | Updated: April 28, 2017 06:02 IST2017-04-28T06:02:28+5:302017-04-28T06:02:28+5:30

दिग्गज अभिनेता असूनही कोणतीही प्रौढी नाही... विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मिळून-मिसळून वागणारे... आश्वासक वातावरण निर्माण करण्याचे कसब

Acting a gorgeous actress | दिग्गज अभिनेत्याचे वागणे साधे

दिग्गज अभिनेत्याचे वागणे साधे

पुणे : दिग्गज अभिनेता असूनही कोणतीही प्रौढी नाही... विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मिळून-मिसळून वागणारे... आश्वासक वातावरण निर्माण करण्याचे कसब, अशा अभिनेत्याच्या आठवणींना एफटीआयआयमध्ये उजाळा मिळाला. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना एफटीआयआयच्या वतीने गुरुवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विनोद खन्ना २००१ ते २००५ या काळात संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
श्रद्धांजली सभेला एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कॅथोला, फिल्म रिसर्च आॅफिसर चंद्रशेखर जोशी, प्रोडक्शन मॅनेजर के. ए. शेख यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विनोद खन्ना यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून झळकला. विनोद खन्ना यांचा गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘अचानक’ हा चित्रपट या वेळी दाखवण्यात आला.
के. ए. शेख म्हणाले, ‘एफटीआयआयचे अध्यक्ष असताना सुषमा स्वराज यांच्यासह त्यांची पहिली भेट याच थिएटरमध्ये झाली होती. त्या वेळी त्यांना घ्यायला आणि सोडायला जाण्याचा योग आला होता. त्या वेळी, संस्थेची परिस्थिती वाईट होती. एफटीआयआय बंद होतेय की काय, अशी भीती निर्माण झाली होती; मात्र संस्था बंद पडणार नाही आणि यातूनही मार्ग मिळेल, अशी आश्वासकता त्यांनी सर्वांमध्ये निर्माण केली. विनोद खन्ना सर्वांशी मिळून-मिसळून वागायचे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांंती देवो, हीच प्रार्थना.’

Web Title: Acting a gorgeous actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.