सदस्यत्व स्थगित झालेल्यांकडून उपोषणाचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:45+5:302021-06-05T04:09:45+5:30

पुणे - राष्ट्र सेवा दलाचा ८० वा वाढदिवस शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. संध्याकाळच्या कार्यक्रमात अमर्त्य सेन, राजमोहन गांधी ...

An act of fasting by those whose membership has been suspended | सदस्यत्व स्थगित झालेल्यांकडून उपोषणाचे कृत्य

सदस्यत्व स्थगित झालेल्यांकडून उपोषणाचे कृत्य

Next

पुणे - राष्ट्र सेवा दलाचा ८० वा वाढदिवस शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. संध्याकाळच्या कार्यक्रमात अमर्त्य सेन, राजमोहन गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला सहा ते सात हजार लोकांनी हजेरी लावली. एकीकडे स्थापना दिवस साजरा होत असताना काही कार्यकर्त्यांनी साने गुरुजी स्मारकात उपोषण करत निषेध नोंदवला. यांपैकी बऱ्याच जणांचे सदस्यत्व स्थगित करण्यात आले आहे, तर काहींची चौकशी सुरू आहे, अशी माहिती राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी दिली.

राष्ट्र सेवा दलाचे ५५ जिल्हे म्हणजेच विभाग आहेत. यापैकी केवळ पाच ते सहा जिल्ह्यांतील साधारण वीस कार्यकर्ते उपोषणाच्या वेळी उपस्थित होते. ५० जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित नव्हते. सध्या राष्ट्र सेवा दलाचे देशभरात ६० हजार कार्यकर्ते आहेत. त्यापैकी २० व्यक्तीच उपस्थित होत्या. यावरूनच ही घटना किती मोठी आहे का, हे ठरवता येईल.

उपोषणाला उपस्थित असलेल्यांपैकी काही जण माजी पदाधिकारी आहेत. सत्ता गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांच्याकडून ही कृती घडली असेल. नवीन विचार स्वीकारण्याची तयारी नसल्याने असंतोष वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रश्नांना यापूर्वी ई-मेलने उत्तरे देण्यात आली होती. मे महिन्यातील दलपत्रिकेमध्येही उत्तरे छापण्यात आली. आमचे प्रश्नही छापावे, अशी त्यांची मागणी असल्याने जूनमधील पत्रिकेत प्रश्न आणि उत्तरे असे दोन्ही छापले गेले आहेत. सर्व आरोपांना उत्तरे देण्यात आली आहेत. माहिती, ऑडिटचे गठ्ठे सर्व काही सोपवण्यात आले आहे.

राष्ट्र सेवा दलाची व्याप्ती भारतभर पसरावी, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. सध्या संघटना २१ राज्यांमध्ये कार्यरत आहे. अशा वेळी माजी पदाधिकाऱ्यांच्या हितसंबंधांना धक्का पोहोचून आपण अल्पमतात जाऊ अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यातून आलेले नैराश्य आणि त्यातून घडलेले कृत्य म्हणून हे उपोषण करण्यात आले. उपोषण करताना कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का बसल्यास अथवा काही अपप्रकार घडल्यास मी आणि कपिल पाटील त्याला जबाबदार असू, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. त्यामुळे आम्ही या उपोषणाची पोलिसांना कल्पना दिली. साथीच्या काळात संचारबंदी असतानाही काही लोक एकत्र आल्याने पोलीस तेथे उपस्थित राहिले. नवीन, चांगले काम पटत नसल्याने आरोप करण्याचे आणि संशय निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक संघटनेत मतमतांतरे असतातच; पण अशा प्रकारची कृती असंतोषातून आली आहे.

- डॉ. गणेश देवी, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल

Web Title: An act of fasting by those whose membership has been suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.