मिलिंद एकबोटे यांच्यासह आठजणांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 09:10 AM2022-10-22T09:10:36+5:302022-10-22T09:15:01+5:30

तब्बल १९ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. डाफरे यांनी हा आदेश दिला...

Acquittal of eight including Milind Ekbote | मिलिंद एकबोटे यांच्यासह आठजणांची निर्दोष मुक्तता

मिलिंद एकबोटे यांच्यासह आठजणांची निर्दोष मुक्तता

Next

पुणे : कोथरूड - पौड रस्त्यावरील कोंडवाड्यात ठेवलेली जनावरे व गाई घेऊन जाण्यासाठी आलेल्या दोघांना जमाव जमवून बेदम मारहाण केल्याच्या आरोपातून मिलिंद एकबोटे यांच्यासह आठजणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. वरील घटना ४ जून २००३ मध्ये घडली होती. तब्बल १९ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. डाफरे यांनी हा आदेश दिला.

एकबोटे यांच्यासह हरिश्चंद्र शिवराम कोंढरे, हेमंत बबनराव बोरकर, बापू बबन काळे, प्रकाश नामदेव शेलार, राजेश बापूराव कोल्हापुरे, रामदास नारायण अंबेकर, पंडित परशुराम मोडक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोंडवाड्यात ठेवलेली जनावरे व गाई घेऊन जाण्यासाठी आलेल्या शकील कुरेशी व नासीर कुरेशी यांना जमाव करून मारहाण केली, अशी फिर्याद शकील कुरेशी यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.

आरोपींच्या वतीने ॲड. महेश गजेंद्रगडकर, ॲड. एम. डी. झोडगे, ॲड. देशपांडे आणि ॲड. डोंगरे यांनी कामकाज पाहिले. सरकारी वकिलांनी या प्रकरणात एकूण पाच साक्षीदार तपासले होते. खटला प्रलंबित असताना आरोपी मनोज रासगे याचे निधन झाले. सरकारी वकील आराेप सिद्ध करू शकले न शकल्याने न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडले.

Web Title: Acquittal of eight including Milind Ekbote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.