शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

आचार्य, कदम, सहाय ठरले ‘स्मार्ट पुणेकर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2015 03:09 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहर कसे, यासाठी महापालिकेकडून घेण्यात आलेल्या ‘माझं स्वप्न - स्मार्ट पुणे’ स्पर्धेत मिलिंद आचार्य यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे

पुणे : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहर कसे, यासाठी महापालिकेकडून घेण्यात आलेल्या ‘माझं स्वप्न - स्मार्ट पुणे’ स्पर्धेत मिलिंद आचार्य यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर शाहूराज कदम आणि प्रशांत सहाय यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला असून, हे तिघेही स्मार्ट पुणेकर ठरले आहेत. महापौर दत्तात्रय धनकवडे आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या विजेत्यांची नावे घोषित केली. विशेष म्हणजे ही तीनही विजेते अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत. स्मार्ट सिटीत नागरिकांच्या सहभागाला सर्वाधिक महत्त्व असल्याने पुणे महापालिकेने नागरिकांकडून सूचना मागविल्या होत्या. आॅनलाइन स्वरूपातील या स्पर्धेत सुमारे सहा हजार दोनशे नागरिकांनी सूचना पाठविल्या. त्यातील, सर्वोत्तम ३० सूचना निवडण्यात आल्या आणि त्यावर पुन्हा नागरिकांची मते मागविण्यात आली. त्यातील, १० स्पर्धकांच्या मुलाखती आणि सादरीकरण घेण्यात आले होते. त्यानुसार, सुमारे ७ हजार नागरिकांनी या प्रमुख दहा सूचनांवर मतदान करून आपले मत नोंदविल्यानंतर सर्वाधिक मते मिळणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुक्त कुमार यांनी दिली. प्रथम पुरस्कारासाठी २५ हजार, तर द्वितीय व तृतीय पुरस्कारासाठी अनुक्रमे १५ आणि १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर या सूचनांचा समावेश स्मार्ट सिटीसाठीच्या प्रस्तावात करण्यात येणार असल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले.स्मार्ट सिटीबाबत केंद्र शासनाकडून येत्या एक-दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे एकत्र असतील का हे चित्र स्पष्ट होईल. मात्र, असे असले तरी, लोकसहभागासाठी महापालिकेने ही स्पर्धा घेतली असल्याने त्याचा बक्षीस वितरण समारंभ थांबविला जाणार नसल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटीतील समावेशावर जोवर अंतिम शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत हे पुरस्कार देण्यात येऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली होती. महापौरांनी मात्र विरोधी पक्षनेत्यांची मागणी फेटाळून लावत स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहराचा समावेश झाला नाही, तरी या नागरिकांच्या सूचना शहराच्या हितासाठी आहेत. त्यामुळे त्यांची पालिकेकडूनही अंमलबजावणी शक्य आहे. त्यामुळे हा कार्यक्रम कोणत्याही स्थितीत रद्द करणार नसल्याचे धनकवडे यांनी या वेळी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)