शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

प्रतिष्ठित होऊ पाहणाऱ्या चोरट्याचा पर्दाफाश ; ४४ गुन्ह्यातील ३० लाखांचा ऐवज जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 21:19 IST

सोनसाखळी चोरी व पहाटे परगावाहून आलेले प्रवासी रिक्षातून जात असताना मोटरसायकलवरुन येऊन प्रवाशांची पर्स चोरुन नेणाऱ्यांनी पुणे पोलिसांना जणू आव्हानच दिले होते़.

ठळक मुद्देतब्बल १०० गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यापैकी ४४ गुन्ह्यातील ऐवज जप्तसोनसाखळी चोरीचे १९, बॅग लिफ्टिंगचे २२ , वाहनचोरी ३ गुन्ह्यांचा समावेश

पुणे : चोरीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातून हॉटेल सुरु करणाऱ्या व प्रतिष्ठित होऊ पाहणाऱ्या चोरट्याचा बुरखा फाडण्यात पुणे पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून तब्बल ४४ सोनसाखळी चोऱ्या व बॅग लिफ्टिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे़.  त्यांच्याकडून तब्बल ३० लाख ७९ हजार ८२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़. त्यांनी अशा प्रकारचे तब्बल १०० गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यापैकी ४४ गुन्ह्यातील ऐवज मिळाला आहे़. राजू खेमू राठोड ऊर्फ राजाभाऊ खेमराज राठोड (वय ३४, रा़. जुना मुंढवा रोड , वडगाव शेरी, मुळ गाव. एकंबी लमाणतांडा, उजनी, जि. लातूर) आणि शंकरराव ऊर्फ शिवा रामदास बिरादार (वय ३४, रा़ कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, मुळ गाव, हैदराबाद) अशी त्यांची नावे आहेत़. सोनसाखळी चोरी व पहाटे परगावाहून आलेले प्रवासी रिक्षातून जात असताना मोटरसायकलवरुन येऊन प्रवाशांची पर्स चोरुन नेणाऱ्यांनी पुणे पोलिसांना जणू आव्हानच दिले होते़. या चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी शहरात सर्वत्र विशेष जेथे बाहेरगावाहून येणाऱ्या बसगाड्या उभ्या राहतात व प्रवासी रिक्षाने जातात. त्या ठिकाणी पहाटे ५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत गस्त लावली होती़. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांची ही गस्त चालू असतानाही चोरटे त्यांना हाताशी लागले नव्हते़. त्याच गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांना या दोघांविषयी माहिती मिळाली़. त्यांनी १० सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा सहा वाजता मांजरी ग्रीन सोसायटी रोडवर सापळा रचून त्यांना पकडले़. त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या ४०० सीसीची मोटरसायकल तसेच त्यांच्याकडे अर्धवट तुटलेले सोन्याचे दागिने सापडले़. त्याबाबत चौकशी केल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली़. त्यांच्याकडे कोणी अडविले तर पळून जाण्यासाठी डोळ्यावर मारण्याचा स्प्रे, स्टीलचा फायटर या वस्तूही मिळाल्या़. पण, त्याबाबत ते काहीही सांगत नव्हते़ त्यांच्याकडील ४०० सीसीची मोटरसायकल चोरीची असल्याचे उघड झाल्यावर त्यांनी आपण सोनसाखळी व बॅग लिफ्टिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली़.. त्यांच्याकडून पुणे शहरातील हडपसर, कोंढवा, वारजे, माळवाडी, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, अलंकार, डेक्कन, शिवाजीनगर, बंडगार्डन, कोथरुड, स्वारगेट, येरवडा, विमानतळ, कोरेगाव पार्क, विश्रामबाग, पिंपरी, भोसरी, निगडी, तसेच पुणे ग्रामीण कडील लोणी काळभोर, यवत व देहुरोड पोलीस ठाण्यातील ४४ गुन्हे उघडकीस आले आहे़. त्यामध्ये सोनसाखळी चोरीचे १९, बॅग लिफ्टिंगचे २२ , वाहनचोरी ३ गुन्ह्यांचा समावेश आहे़.त्यात २३ लाख ६३ हजार ६७८ रुपयांचे ८५६़ ४६ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीच्या दोन आंगठ्या व चांदीचा शिक्का, २ मोटरसायकली, १० मोबाईल हँडसेट असा ३० लाख ७९ हजार ८२० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक निरीक्षक संतोष तासगांवकर, भालचंद्र ढवळे, सहायक फौजदार लक्ष्मण शिंदे, अजय जाधव, हवालदार संतोष मोहिते, प्रविण शिंदे, राजेश रणसिंग, सचिन घोलप, समीर शेख, अमजद पठाण, केरबा गलांडे, प्रदीप सर्वे, पोलीस नाईक प्रमोद घाडगे, दया शेगर, प्रमोद गायकवाड, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, अंकुश काळभोर, अंकुश जोगदंडे, अशोक शेलार, संजयकुमार दळवी, स्रेहल जाधव यांनी केली आहे़. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकtheftचोरी