शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा खून करून फरारी असणाऱ्या आरोपीला शिर्डीमध्ये अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 17:15 IST

उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून सदर महिलेचा खून करून आरोपी हा फरार झाला होता.

नऱ्हे : सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथील साईनगरमध्ये १३ एप्रिल रोजी कस्तुरी शेखर माने (वय ४५, रा. शिवपार्वती बंगला, हिंगणे खुर्द) महिलेचा मृतदेह आढळून आला होता. उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून सदर महिलेचा खून करून आरोपी रवींद्र श्रीनिवास जालगी (वय ४८, कर्वेनगर) हा फरार झाला होता. सोमवारी (दि.१०) पहाटे पाचच्या सुमारास आरोपीस शिर्डीमधून ताब्यात घेतले असल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी दिली.    

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळच्या कर्नाटकच्या असणाऱ्या कस्तुरी माने सिंहगड रस्त्यावरील हिंगणे भागात भाडयाने प्लॅट घेऊन आपल्या दोन मुलांसह राहत होत्या. त्या महिलांसाठी ड्रायव्हिंग क्लास घेत असत. आरोपी रवींद्रने मयत कस्तुरी यांच्याकडून वेळोवेळी हातउसने म्हणून आत्तापर्यंत पंधरा लाख रुपये घेतले होते. माने यांच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांनी आरोपीकडे पैशाची मागणी केली, यावरून दोघांत सतत वाद झाल्याने आरोपीने गळा आवळून त्यांचा खून करून फरार झाला होता.  सदर आरोपी हा शिर्डी येथील साईधाम आश्रमात असल्याची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे, तसेच  पोलीस शिपाई किशोर शिंदे, बालाजी जाधव, दत्ता सोनवणे , रफिक नदाफ, अविनाश कोंडे यांनी शिर्डी पोलिसांच्या मदतीने आरोपीला सोमवारी पहाटे पाच वाजता ताब्यात घेतले असून त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सिंहगड पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणेshirdiशिर्डीArrestअटकMurderखून