स्टेमसेल्स साठवण्याची कंपनी अाहे असे सांगून ६६० जणांना गंडा घालणारा न्यायालयास शरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 02:06 PM2018-12-13T14:06:08+5:302018-12-13T14:08:43+5:30

भविष्यात होणा-या आजारापासून संरक्षण देण्यासाठी नवजात बाळाच्या नाळेतील रक्त प्रीझर्व्ह (स्टेमसेल्स) करून ठेवणापी बायोटेक कंपनी बंद करून पसार झालेला ठग अखेर न्यायालयास शरण आला आहे.

accused surrender to court for doing fraud in stem cells | स्टेमसेल्स साठवण्याची कंपनी अाहे असे सांगून ६६० जणांना गंडा घालणारा न्यायालयास शरण

स्टेमसेल्स साठवण्याची कंपनी अाहे असे सांगून ६६० जणांना गंडा घालणारा न्यायालयास शरण

Next

पुणे : भविष्यात होणा-या आजारापासून संरक्षण देण्यासाठी नवजात बाळाच्या नाळेतील रक्त प्रीझर्व्ह (स्टेमसेल्स) करून ठेवणापी बायोटेक कंपनी बंद करून पसार झालेला ठग अखेर न्यायालयास शरण आला आहे. त्याने आत्तापर्यंत ६६० जणांची २६ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
 
        डॉ. चैतन्य अरुण पुरंदरे (वय  ४८, रा. हरेकृष्ण मंदिर रस्ता, मॉडेल कॉलनी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी यापुर्वी कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. आरोपी २०१६ साली कंपनीची जागा आणि नाळ जतन करायचे बंद साहित्य विकून पसार झाला होता. याबाबत स्मिता गोपाल तिजुरी (वय ६०, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार डॉ. चैतन्य पुरंदरे याच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पुरंदरे यांने अटकपुर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने त्यास पुणे न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याला बुधवारी ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक यु. एच. माळी यांनी दिली. 

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, पौड रस्त्यावरील शिला विहार कॉलनी येथे सुदर्शन अपाटमेंटमध्ये डॉ. चैतन्य कॉर्ड लाइफ बायोटेक कार्यालय होते. २७ मे २००८ ते २ जून २००८ या कालावधीत फिर्यादी यांची मुलगी डिलेव्हरीसाठी स्वारगेट येथील पाटणकर नर्सिंग होम्स येथ दाखल झाली होती. त्या वेळी त्यांचा विश्वास संपादन करून डॉ. चैतन्य पुरंदरे आणि त्याच्या साथीदार महिलांनी स्टेमसेल्सबद्दल त्यांना माहिती दिली. तुमच्या बाळाच्या नाळेतील रक्त प्रीझर्व्ह केले जाईल. भविष्यात त्याला कोणतेही आजारपण आले, तर त्यावर औषध शोधता येऊ शकते. त्यामुळे त्याला संरक्षण मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांच्याकडून ६५ हजार रुपये घेण्यात आले. तिजुरी यांनी स्टेमसेल्स बद्दल चौकशी केली नाही. दरम्यानच्या काळात डॉ. चैतन्य कॉर्ड लाइफ बायोटेकचे कार्यालय बंद करण्यात आले. याबद्दल तिजुरी यांना कळविण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. पुरंदरेने गाशा गुंडाळल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांनी कोथरूड पोलिसांना अर्ज दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

साठवलेल्या ६६० स्टेमसेल्स खराब 
आरोपींनी साठवलेल्या ६६० स्टेमसेल्स खराब झाल्याचा अहवाल नॅशनल केमीकल एक्सपर्टने दिला आहे. स्टेमसेल्स घेतल्यापासून त्या २१ वर्ष जतन करण्याचा करार आरोपी आणि स्टेमसेल्स देणा-या व्यक्तींत झाला होता. मात्र त्यापुर्वीच पुरंदरे यांचे भिंग फुटले आहे. 

Web Title: accused surrender to court for doing fraud in stem cells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.