शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

घोडेगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत आरोपीची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 9:50 PM

आरोपीने अंथरण्यासाठीच्या ब्लँकेटची रस्सी बनवून टॉयलेटच्या खिडकीला गळफास घेतल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देघोडेगाव पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद सदर प्रकरणात प्रसारमाध्यमांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न

घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसाडेसात वाजता घडली. सुलदास उंबºया काळे ऊर्फ कुक्या काळे (वय २५, रा. सुरेगाव, तालुका श्रीगोंदा, जि. नगर) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. घोडेगाव येथील ठाण्यात आरोपीने आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे. आरोपीने आत्महत्या केली आहे का? याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर पोलिसांनी सुलदास उंबऱ्या काळे ऊर्फ कुक्या काळे याला बुधवारी (दि. १३ जून) अहमदनगर पोलिसांकडून लांडेवाडी येथील दरोड्यासंदर्भात कबुली दिल्याने ताब्यात घेतले होते. गुरुवारी घोडेगाव न्यायालयाने ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. आरोपीने अंथरण्यासाठीच्या ब्लँकेटची रस्सी बनवून टॉयलेटच्या खिडकीला गळफास घेतल्याचे दिसून आले. मंचर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार राजेंद्र कांबळे हे घोडेगाव सबजेल येथे गार्डड्यूटी म्हणून नेमणुकीला होते. त्यांची ड्युटी चालू असताना त्यांना त्याच्या कस्टडीतील आरोपी दिसला नाही. त्यामुळे त्यांनी कस्टडीतील शौचालयाकडे पाहिले असता शौचालयाचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. सहायक फौजदार राजेंद्र कांबळे यांनी आरोपीला हाका मारल्या असता, आतून पतिसाद न मिळाल्यामुळेल त्यांनी ड्युटीवर असलेल्या सहकाऱ्याला बोलावून लॉकअपमधून शौचालयाचा दरवाजा उघडून पाहिले असता आरोपीने गळफास घेतल्याचे दिसून आले. आरोपीच्या आत्महत्येसंदर्भात घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांना सदर माहिती देऊन वरिष्ठांना माहिती कळविली. पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय घोडेगाव या ठिकाणी वैद्यकीय तपासणीकरिता आणले असता डॉक्टरांनी सदर आरोपीला तपासून मृत झाल्याचे जाहीर केले. आरोपीचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात होणार असून ३ डॉक्टरांचे पथक शवविच्छेदन करेल. अंतिम पंचनामा हा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. शवविच्छेदन करताना व्हिडीओग्राफी होणार आहे. घोडेगाव पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार पुढील तपास करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सदर बाब राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला कळविण्यात आली आहे. घटनास्थळी पुणे ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, पोलीस उपविभागीय अधिकारी राम पठारे, दयानंद गावडे यांनी भेट दिली.घडलेली घटना दुर्दैवी असून त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. तर, सदर प्रकरणात प्रसारमाध्यमांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुलदास काळे याच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडू केली जात आहे.

टॅग्स :MancharमंचरDeathमृत्यूPoliceपोलिस