चाकण येथे अकाऊंटंटला बेदाम मारहाण करून अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 13:08 IST2018-05-21T13:08:00+5:302018-05-21T13:08:00+5:30
अकाउंटंटला बेदाम मारहाण करून त्याचे अपहरण केल्याची घटना घडली आहे.

चाकण येथे अकाऊंटंटला बेदाम मारहाण करून अपहरण
चाकण : येथील कोहिनुर सेंटरमधील अकाउंटंट संतोष रामभाऊ सहाणे (वय ४०) यास अज्ञात इसमांनी बेदाम मारहाण केली. या अज्ञातांनी बेकायदा जमाव जमवून संतोष सहाणे यास मारहाण करून त्याला चार चाकी गाडीतून पळवून नेऊन अपहरण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी रविवारी (दि.२० मे) रोजी चाकण पोलीस ठाण्यात १३ अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार नामदेव जाधव यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (दि. १९) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कोहिनुर सेंटर समोर घडली. याबाबत हॉस्पिटल मधील डॉ. प्रणव मिलिंद देशमुख ( वय २७, रा. कोअर हॉस्पिटल, चाकण ) यांनी फिर्याद दिली. कोहिनुर सेंटर मधील कोअर हॉस्पिटलमध्ये काम करणारा अकाऊंटंट संतोष रामभाऊ सहाणे (वय ४०, रा. मोशी, आळंदी रोड, ता.हवेली, मुळगाव आळे कोळवाडी, मांडवदरा, ता.जुन्नर ) यास स्विफ्ट कार क्रमांक (एमएच. ४३ एल.२३२३) व इनोव्हा कार (एमएच. १४ ईसी. ११९९) मधून आलेल्या अज्ञात १३ इसमांनी बेकायदा जमाव जमवत सहाणे याला मारहाण करून स्विफ्ट कारमध्ये बसवून पळवून नेले. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.