शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
2
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
3
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
4
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
5
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
6
शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट?; वळसे पाटलांनी दिलेल्या उत्तराने राजकीय चर्चांना उधाण
7
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
8
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
9
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
10
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
11
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
12
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
13
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
14
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
15
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
16
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
17
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
18
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
19
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
20
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती

सीसीटीव्ही अन् कारवाईमुळे सलग तिसऱ्या वर्षी घटले अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 3:15 PM

रस्ते सुरक्षेचे सातत्याने धडे : हेल्मेट कारवाईचाही परिणाम 

ठळक मुद्देमृतांची संख्याही झाली कमी : वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम  एकूण अपघातांमध्ये तीन वर्षांत जवळपास निम्म्याने घट झाल्याचे चित्र २०१७ मध्ये जीवितहानी झालेल्या अपघातांची संख्या ३६० एवढी शहरातील अपघातांचे प्रमाण सलग तिसऱ्या वर्षी कमी मागील दोन वर्षांत अनुक्रमे २४० व १९९ पर्यंत घट

पुणे : अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे शहरातील अपघातांचे प्रमाण सलग तिसऱ्या वर्षी कमी झाले आहे. २०१७ मध्ये जीवितहानी झालेल्या अपघातांची संख्या ३६० एवढी होती. त्यामध्ये मागील दोन वर्षांत अनुक्रमे २४० व १९९ पर्यंत घट झाली आहे. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्याही त्याच प्रमाणात खाली आली आहे. एकूण अपघातांमध्ये तीन वर्षांत जवळपास निम्म्याने घट झाल्याचे चित्र आहे. वाहनचालकांवर सीसीटीव्हींची नजर, वाहतूक नियमांमुळे जनजागृती आणि कारवाईमुळे वाहनचालक नियमात वाहने चालवित आहेत. परिणामी अपघात कमी होत आहेत. मागील काही वर्षांत शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत गेली. ही संख्या जशी वाढत गेली, तसे अपघातांचे प्रमाणही वाढले. वाहतुकीचा वेग मंदावला असला तरी बेशिस्तपणा वाढत गेला. अनेक वाहनचालक सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडत असल्याचे दृश्य सर्वच रस्त्यांवर पाहायला मिळते. अनेक रस्त्यांची अवस्थाही फारशी चांगली नाही. या विविध कारणांमुळे शहरात दररोज अपघात घडतात. त्यातील काही अपघात गंभीर स्वरूपाचे असून अनेकांचा मृत्यू होत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये डिसेंबरअखेरपर्यंत एकूण १९९ मोठे अपघात झाले. त्यामध्ये २०६ जणांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये हा आकडा अनुक्रमे २४० व २५३ एवढा होता. तर २०१७ मध्ये ३६० जीवघेणे अपघात झाले होते. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवरून या अपघातांचे प्रमाण घटत असल्याचे स्पष्टपणे दिसते. शहरात २०१७ मध्ये एकूण १५०७ अपघात झाले होते. त्यापैकी सर्वाधिक ६०७ अपघात गंभीर स्वरूपाचे असून त्यामध्ये ७१० जणांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. या अपघातांचा आकडा २०१८नंतर जवळपास निम्म्याने कमी झाला. किरकोळ स्वरूपाच्या अपघातांमध्येही लक्षणीय घट झाली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या विविध उपाययोजनांमध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे. ......वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. रस्ते सुरक्षेसंदर्भात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नियमांचे पालन करणाऱ्या चालकांसाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आल्या असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. हेल्मेट कारवाईमुळे हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्याबरोबरच जीवितहानीचे प्रमाणही घटले आहे..........शहरातील सर्व प्रकारच्या अपघातांची स्थिती     अपघात                                                                     वर्ष                                                                      २०१७    २०१८    २०१९जीवघेणे अपघात                                             ३६०    २४०       १९९मृत्यू                                                               ३७३     २५३       २०६गंभीर अपघात                                                ६०७    ३८९    ३४५ (नोव्हें.पर्यंत)गंभीर जखमी                                                  ७१०    ४६६    ४१०किरकोळ अपघात                                            ३५८    १७८    १२७ (नोव्हें.पर्यंत)जखमी                                                            ४४१    २२५    १४६जखमी नसलेले अपघात                                  १८२    ९२    ६० (नोव्हें.पर्यंत)एकूण अपघात                                                १५०७    ८९९    ७३१......

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिस