ह्दयद्रावक! लग्नाची पत्रिका देवाला देण्यासाठी गेलेल्या तरूणासह दोघांचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 22:26 IST2022-06-09T22:21:36+5:302022-06-09T22:26:21+5:30
हिंजवडी परिसरातील तिघांचा अपघाती मृत्यू.आयटीनगरीतून हळहळ व्यक्त.

ह्दयद्रावक! लग्नाची पत्रिका देवाला देण्यासाठी गेलेल्या तरूणासह दोघांचा अपघाती मृत्यू
हिंजवडी : लग्नाची पत्रिका देवाला ठेऊन, देव दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावर भीषण अपघातात मृत्यू झाला. या घटनेने आयटीनगरी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आकाश ज्ञानेश्वर साखरे (वय २८, रा.हिंजवडी) दीपक सुभाष बुचडे (वय २९, रा.मारुंजी) आशुतोष संतोष माने (वय २३, रा.हिंजवडी) अशी मयत तरुणांची नावं आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, दीपक बुचडे याचे १८ जून रोजी लग्न होते. ते, लग्नाची पत्रका देवासमोर ठेऊन देवदर्शन करण्यासाठी आपल्या मित्रांसमवेत अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर येथे गेले असता.
बुधवार (दि.८) रोजी रात्री अकराच्या सुमारास बिंजगेर, (ता.अक्कलकोट) रस्त्यावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. दिपक बुचडे यांचे चुलत भाऊ चंद्रकांत राघुजी बुचडे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात ट्रक ट्रेलर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हिंजवडी, मारूंजी परिसरातून अनेक तरूणांनी अक्कलकोट परिसराकडे धाव घेतली आहे. उमद्या वयातील तीन युवक अपघाती मृत्यू झाल्याने आयटीनगरी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.