हॉटेल व्यावसायिक दिवेकर यांचा अपघाती मृत्यू

By admin | Published: April 26, 2017 02:44 AM2017-04-26T02:44:58+5:302017-04-26T02:44:58+5:30

बारामती शहरातील हॉटेल कृष्णसागरचे संचालक अमित दिवेकर (वय ४२) यांचा मंगळवारी (दि. २५) अपघाती मृत्यू झाला.

Accidental Death of Hotel Commercial Divakar | हॉटेल व्यावसायिक दिवेकर यांचा अपघाती मृत्यू

हॉटेल व्यावसायिक दिवेकर यांचा अपघाती मृत्यू

Next

बारामती : बारामती शहरातील हॉटेल कृष्णसागरचे संचालक अमित दिवेकर (वय ४२) यांचा मंगळवारी (दि. २५) अपघाती मृत्यू झाला. दिवेकर पुण्याच्या दिशेने निघाले होते. दुपारी २ च्यादरम्यान मोरगावच्या पुढे त्यांचे नियंत्रण सुटल्याने मोटार उलटून अपघात झाला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवेकर पुण्याच्या दिशेने ब्रीझा मोटार (एमएच ४२/ एएच ६७८७) मधून निघाले होते. या वेळी पुणे-मोरगाव रस्त्यावर मोरगावपासून पुढे १ किमी अंतरावर लवटेवस्ती नजीक दिवेकर यांना मोटारीवर नियंत्रण मिळविता आले नाही.
त्यामुळे मोटार दोन ते तीन वेळा उलटून अपघात झाला. यामध्ये मोटारीचा चक्काचूर झाला असून दिवेकर यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती समजताच पोलीस हवालदार दीपक वारोळे, मत्रे, केचे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दिवेकर यांना गावडे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना दिवेकर यांचा मृत्यू झाला.

Web Title: Accidental Death of Hotel Commercial Divakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.