शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात; ३ जण ठार, २ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 19:04 IST

शिक्रापूर बाजूकडून तळेगावकडे जाणाऱ्या कंटेनरची राजगुरूनगरकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडक

चाकण : येथील तळेगाव चौकात आज ( दि.२६) रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास सिलेंरो कार, स्कॉर्पिओ व कंटेनर या तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात सिलेंरो कार मधील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.यातील दोन युवक सख्खे चुलत भाऊ असून वाकी बुद्रुक व एक जण कडूस ( ता.खेड ) येथील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल संपत सोनवणे ( वय.२७ वर्षे,रा.वाकी बुद्रुक ),अक्षय मारुती सोनवणे ( वय.२३ वर्षे,रा.वाकी बुद्रुक ),अविनाश रोहिदास अरगडे ( वय.२८ वर्षे,रा.कडूस,ता.खेड ) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.यातील अक्षय सोनवणे यांचा अपघात झालेल्या तळेगाव चौकात वेदिका चाय या नावाने हॉटेल व्यवसाय करत होता.

शिक्रापूर बाजूकडून तळेगावकडे जाणाऱ्या  ( एम.एच.०४ एफ यु ०१९१ ) या कंटेनरची राजगुरूनगर बाजूकडे भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडक बसल्याने स्कॉर्पिओ चालकाचा ताबा सुटला आणि सिग्नलला उभ्या असलेल्या सिलेंरो कारला भरधाव स्कॉर्पिओ गाडीचा अत्यंत वेगाने जोराची धडक बसली,या भीषण अपघातात तीन युवकांचा जागेवरच अंत झाला.तर स्कॉर्पिओ गाडीतील दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चाकणपोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

टॅग्स :ChakanचाकणAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस