पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे अपघात; एक ठार, तिघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 11:30 IST2018-01-18T11:30:20+5:302018-01-18T11:30:53+5:30

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन गावातील चौकात भरधाव ट्रकने टाटा मॅजिकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच ते सहा जखमी झाले आहेत.  

Accident in Pune-Solapur highway at Uruli Kanchan; One killed, three seriously injured | पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे अपघात; एक ठार, तिघे गंभीर जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे अपघात; एक ठार, तिघे गंभीर जखमी

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन गावातील चौकात भरधाव ट्रकने टाटा मॅजिकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच ते सहा जखमी झाले आहेत.  
वामन कांचन असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून तिघे गंभीर जखमी आहेत. हा अपघात सकाळी साडे सातच्या सुमारास झाला. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Accident in Pune-Solapur highway at Uruli Kanchan; One killed, three seriously injured