कात्रज कोंढवा रोडला अपघात; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2023 23:19 IST2023-08-13T23:18:20+5:302023-08-13T23:19:01+5:30
कात्रच कोंढवा रोडवर अपघाताचे सत्र सुरूच असून ऑगस्ट महिन्यातील हा तिसरा अपघात आहे.

कात्रज कोंढवा रोडला अपघात; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
कात्रज : कात्रच कोंढवा रोडवर अपघाताचे सत्र सुरूच असून ऑगस्ट महिन्यातील हा तिसरा अपघात आहे. दहा ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कात्रज कोंढवा रोड वर मोठा अपघात झाला होता यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला होता. तर पाच ऑगस्टला झालेल्या अपघातात एका तरुण युवकाचा देखील मृत्यू झाला होता.
अपघाताच्या घटना ताज्या असतानाच रविवारी रात्री दहाच्या सुमारास कात्रज कोंढवा रोडवरील माऊली गार्डन समोर एका कंटेनरच्या चाका खाली येऊन प्रभावती पांडुरंग अनभुले (वय ७०) रा. विघ्नहर्ता नगर या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कात्रज कोंढवा रोडवर अपघात झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस पोहचले असून वाहतूक सुरळीत करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. कात्रज कोंढवा रोडवर वारंवार होत असणारे अपघात. रस्त्याचे अर्धवट काम यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून शासनाकडून जलद गतीने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.