मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन जण ठार, तर चार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 10:21 IST2020-06-29T10:21:06+5:302020-06-29T10:21:48+5:30
गावाजवळ द्रुतगती मार्गावर असलेल्या उतारावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्या कंटेनरने समोर जाणारा ट्रक, मोटार कार व टेम्पो यांना धडक दिल्याने हा अपघात झाला.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन जण ठार, तर चार जखमी
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीतील ढेकू गावाजवळ मुंबईच्या दिशेने जाणार्या चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ढेकू गावाजवळ द्रुतगती मार्गावर असलेल्या उतारावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्या कंटेनरने समोर जाणारा ट्रक, मोटार कार व टेम्पो यांना धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर गाड्यांमध्ये अडकलेले चार जण जखमी झाले आहेत. सर्व अपघातग्रस्त वाहने रस्त्यात असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेनऊनंतर वाहने बाजूला केल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली.