Accident: मोरगाव-बारामती रस्त्यावर भीषण अपघात; आई अन् मुलानं गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 10:11 PM2022-10-27T22:11:37+5:302022-10-27T22:29:04+5:30

Accident: मोरगाव - बारामती या जिल्हा मार्ग क्रमांक 65 वर काऱ्हाटी नजीक  फोंडवाडा येथे   चारचाकी गाडीने दुचाकी वरील दोन व्यक्ती व एक   पादचारी यांना जोरदार ठोस दिली आहे .

Accident: Fatal accident on Morgaon-Baramati road; Mother and son lost their lives | Accident: मोरगाव-बारामती रस्त्यावर भीषण अपघात; आई अन् मुलानं गमावला जीव

Accident: मोरगाव-बारामती रस्त्यावर भीषण अपघात; आई अन् मुलानं गमावला जीव

Next

बारामती -मोरगाव रस्त्यावर गुरुवारी (दि २७) कार ने धडक दिल्याने गंभीर अपघात झाला.या अपघातात दुचाकीवरील माय लेकरासह रस्त्यावरील पादचाऱ्याचा म्रुत्यू झाला.

या जिल्हा मार्ग क्रमांक ६५ वर काऱ्हाटी नजीक  फोंडवाडा येथे   कार ने दुचाकी वरील दोन व्यक्ती व एक   पादचारी यांना जोरदार ठोस दिली आहे . या  भीषण  झालेल्या अपघातात  तीन  जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक   घटना आज घडली आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की स्कुटी या  दुचाकीवरुन  कऱ्हावाघज येथील राऊत कुटुंबातील  आई व मुलगा असे  दोन जण मोरगाव- बारामती रस्त्याने  कऱ्हावाघज  चालले होते . तर  फोंडवाडा  येथील   दशरथ गुलाबराव पिसाळ( वय ६२ )वर्षे हे  रस्त्याच्या बाजुने  फोंडवाडा  येथे जात होते.त्याच दरम्यान बारामती बाजुने वेगवान चारचाकी गाडी आली . या गाडीने तीघांना जोरदार ठोस दिली . यामध्ये  तीन जण जागीच मृत्यू पावले आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी   दाखल झाले असून घटनेचा पंचनामा त्यांनी नोंद करुन पुढील कार्यवाही सुरु आहे .

Web Title: Accident: Fatal accident on Morgaon-Baramati road; Mother and son lost their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.