शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
2
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
3
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
4
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
5
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
6
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
7
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
8
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
9
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
10
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
11
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
12
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
13
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
14
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
15
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
16
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
17
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
18
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
19
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
20
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नगर-कल्याण महामार्गावर सहलीच्या बसला अपघात; तीन जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 23:42 IST

पिकअप ट्रक आणि अहमदनगर येथील विद्यालयाच्या शैक्षणिक सहल घेऊन चाललेल्या बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

पिंपरी पेंढार : नगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर गायमुखवाडी (पिंपरी पेंढार, ता. जुन्नर)  येथे कांद्याने भरलेला पिकअप ट्रक आणि अहमदनगर येथील विद्यालयाच्या शैक्षणिक सहल घेऊन चाललेल्या बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून,  शिक्षकांसह सुमारे ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की पिकअप पूर्ण बसखाली गेली होती. तसेच दोन्ही वाहनांनी पेट घेतला होता. मृतांची नावे समजू शकली नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील सावेडी येथील डॉन बॉक्सो विद्यालयाचे नववी, दहावी, अकरावी व बारावीचे विद्यार्थी शैक्षणिक सहलीला खासगी ट्रॅव्हलद्वारे नगर-कल्याण मार्गाद्वारे जात होते. ही बस पिंपरी पेंढार येथील गायमुखवाडी येथे आली असता समोरून कांद्याने भरून येणारा भरधाव पिकअप या बसला येऊन धडकला. या भीषण अपघातात बसमधील  तिघे जण मृत्युमुखी पडले, तर ३० विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली.

 

जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ओतूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी  घटनास्थळी तातडीने हजर झाले. अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांनी पेट घेतला होता. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

टॅग्स :Accidentअपघात