अपघात की घातपात?

By Admin | Updated: July 17, 2014 03:24 IST2014-07-17T03:24:49+5:302014-07-17T03:24:49+5:30

निकिताचा मृत्यू अपघात नसून, हा घातपाताचा प्रकार आहे. मुलीला मारणाऱ्यांना ताब्यात घ्या, अटक करा,’ असा टाहो निकिताची आई सीता निसर्गंध यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर फोडला

Accident of Accident? | अपघात की घातपात?

अपघात की घातपात?

पिंपरी : ‘निकिताचा मृत्यू अपघात नसून, हा घातपाताचा प्रकार आहे. मुलीला मारणाऱ्यांना ताब्यात घ्या, अटक करा,’ असा टाहो निकिताची आई सीता निसर्गंध यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर फोडला. त्यामुळे निकिताचा मृत्यू अपघात की घातपात आहे याचा छडा लावणे, या घटनेची उकल करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. ‘गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही’ अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
निगडीतील भक्ती-शक्ती चौक - भोसरी स्पाइन रस्त्यावर चिखलीत महापालिकेचा स्वस्तातील घरकुल हा गृहप्रकल्प आहे. घरकुल सहकारी गृहरचना संस्थेतील कुलस्वामिनी इमारत (३१, सी २३) आहे. त्यातील पाचव्या मजल्यावर ५०३ क्रमांकाची सदनिका सीता निसर्गंध यांची आहे. पतीचे निधन झाले असल्याने ३ मुली आणि २ मुलांसह त्या येथे वास्तव्यास आहेत. धुणी-भांडी करण्याचे काम करीत असल्याने घराबाहेर पडल्या होत्या. निकिताची भावंडेही शाळेत गेली होती. ती घरात एकटीच होती.
भंगारवाल्यामुळे घटना उघड
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कुलस्वामिनी इमारतीत सकाळी पावणेअकराच्या सुमारास एक भंगारवाला आला. त्याला पार्किंगमध्ये एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्याने याबाबतची माहिती इतर सदनिकाधारकांना दिली. त्यानंतर संजय ओव्हाळ, जनार्दन उबाळे, श्रीरंग कोळेकर, अजित गायकवाड यांनी धाव घेऊन निकिताला रिक्षातून जवळच्या रुग्णालयात नेले, तर काहींनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात नेला. दरम्यान, याच कालखंडात दोन संशयित व्यक्ती येथे सापडल्याने त्यांनाही नागरिकांनी चोप दिला.
गौतम गायकवाड म्हणाले, ‘‘निकिता ही माझ्या भाचीची मुलगी आहे. घटनास्थळ पाहता तिने उडी मारलेली दिसत नाही. तिला कोणीतरी ढकलून दिले आहे. तिचा मृत्यू अपघाती नसून, घातपाताचाच प्रकार असण्याची दाट शक्यता आहे. याचा तपास करण्याची गरज आहे.’’
नातेवाइकांनी तिच्या आईची समजूत काढल्यानंतर सायंकाळी सहानंतर निकिताचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले. संरक्षक कठडे बसवावेत जेथून निकिता पडली. तेथील भिंत अडीच फूट उंचीची आहे. त्यावर संरक्षक कठडे बसविलेले नाहीत. येथे संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Accident of Accident?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.