विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन, मुख्याध्यापकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 03:01 IST2018-08-27T03:01:43+5:302018-08-27T03:01:59+5:30

येरवड्याच्या शाळेतील घटना

Abusive behavior towards the student, head of the crime | विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन, मुख्याध्यापकावर गुन्हा

विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन, मुख्याध्यापकावर गुन्हा

पुणे : विद्याार्थिनीसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या येरवडा भागातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुख्याध्यापक सुनील शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्याार्थिनीने याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार सोळा वर्षीय मुलगी येरवडा भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. काही महिन्यांपूर्वी विद्याार्थिनी शाळेतील शिक्षक आराम कक्षात गेली होती. त्या वेळी शिंदे यांनी माझ्यासोबत असभ्य वर्तन केल्याची तक्रार तिने फिर्यादीत दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक स्वप्ना वाघमारे तपास करत आहेत.

Web Title: Abusive behavior towards the student, head of the crime