शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेशी अश्लील कृत्य करत शिवीगाळ, कारचालकावर गुन्हा; कल्याणीनगर भागातील घटना

By नितीश गोवंडे | Updated: December 9, 2024 19:20 IST

कल्याणीनगर परिसरातील मेट्रो पुलाजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने तक्रारदाराच्या महिलेच्या कारला धडक दिली.

पुणे : कारच्या धडकेत आरसा तुटल्याने जाब विचारणाऱ्या कारचालक आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना कल्याणीनगर भागात घडली. याप्रकरणी कार चालकाविरोधात विनयभंग, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी एका कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि तिचे पती कल्याणीनगर भागातून रविवारी (दि. ८) रात्री साडेआठच्या सुमारास कारने निघाले होते. कल्याणीनगर परिसरातील मेट्रो पुलाजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने तक्रारदाराच्या महिलेच्या कारला धडक दिली. धडकेत त्यांच्या कारचा आरसा तुटला. त्यामुळे महिलेच्या पतीने कार चालकाला जाब विचारला. कार चालकाने रस्त्यात वाद घालण्यास सुरुवात केली. कार रस्त्यात आडवी लावली.त्याने कार चालकाला धक्काबुक्की केली. शिवीगाळ करणाऱ्या आरोपी कार चालकाला समजावण्यासाठी महिला कारमधून उतरली तेव्हा आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य करून शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश लामखेडे करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयWomenमहिला