शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवस डांबून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 15:38 IST

वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेले ३० हजार मुलगी परत करू शकली नाही, म्हणून शेजारील जोडप्यांनी तिचे अपहरण करून वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले

धनकवडी (पुणे: दिवस बुधवारचा. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन. तिथला फोन खनाणतो आणि माहिती मिळते की, के के मार्केट परिसरातील लॉजवर एका मुलीला डांबून ठेवण्यात आलय. पोलीस तिथे पोहोचतात. लॉज मधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करतात. त्यानंतर तिच्याकडे केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येते. मागील ६ महिन्यांपासून या मुलीवर सतत बलात्कार करण्यात आलाय. तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होतं. तिच्या घराजवळ राहणाऱ्या एका जोडप्यानेच तिला हे सर्व करण्यास भाग पाडलं होतं. 

विश्रांतवाडी परिसरात राहणारी १७ वर्षाची तरुणी, वडिलांना दारूचे व्यसन होते. तसेच ते सतत आजारी असायचे. त्यामुळे वडिलांचे उपचारासाठी तिने घराशेजारीच राहणाऱ्या आकाश माने आणि पुनम माने या जोडप्याकडून तीस हजार रुपये उसने घेतले होते. मात्र हे पैसे ती परत करू शकली नाही. त्यामुळे या दोघांनी या मुलीचे अपहरण केलं. त्यानंतर के के मार्केट परिसरातील लॉजवर डांबून ठेवलं. आकाश माने याने तिच्यावर बलात्कार केला. आणि इतक्यावरच थांबला नाही तर तिला जबरदस्तीनं वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं. पुणे शहरातील ग्राहक शोधून तो तिला वेगवेगळ्या लॉजवर पाठवत राहिला. आणि हा संपूर्ण प्रकार मागील 6 महिन्यांपासून सुरू होता.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पुनम माने या महिलेला अटक केली. तर तिचा पती आकाश माने सध्या फरार आहे. याशिवाय या संपूर्ण प्रकरणात पीडित मुलीला ज्या ज्या लॉजवर नेण्यात आलं होतं ते ते लॉज मालक सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाSocialसामाजिक