शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाकडून मोकातील फरार आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 7:40 PM

संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाकडून मोकातील फरारी आरोपीस अटक करण्यात आले. त्याच्या ताब्यातून ३५ हजार ९०० रुपयांची शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मोका) फरारी आरोपीस अटक एक गावठी पिस्तूल, तीन जीवंत काडतूसे अशी ३५ हजार ९०० रुपयांची शस्त्रास्त्रे हस्तगत

पुणे : संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाकडून (उत्तर विभाग) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मोका) फरारी आरोपीस अटक करण्यात आले. त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, तीन जीवंत काडतूसे अशी ३५ हजार ९०० रुपयांची शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.राहुल चंद्रकांत पवार ( वय २४, रा. नसरापूर, ता. भोर) असे आरोपीचे नाव आहे. त्याची भोर तालुक्यात गुन्हेगारी टोळी आहे. खंडणी विरोधी पथकाला मोकातील फरार आरोपी वडगाव बुद्रुक गावठाणात कॅनॉलजवळ येणार असल्याची, तसेच त्याच्याजवळ गावठी पिस्तूल असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांनी सापळा रचून त्यास अटक केली. त्याच्या झडतीत एक गावठी पिस्तूल व तीन जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली. त्याच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, पळवून नेणे, गंभीर जखमी करणे, जागेचा कब्जा घेणे व पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.  ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस कर्मचारी निलेश शिवतरे, भालचंद्र बोरकर, तानाजी गाडे, अतुल मेंगे, दत्ता फुलसुंदर, शितल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :Puneपुणे