कंटेनर लुटणारी टोळी पकडली, आणे घाटात कारवाई, १४ लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 02:15 AM2017-09-14T02:15:25+5:302017-09-14T02:15:35+5:30

अहमदनगर-कल्याण महामार्गावरील आणे (ता. जुन्नर) येथील घाटात कंटेनरचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून १४ लाख ४२ हजार रुपयांचा गाय छाप तंबाखूचा माल लुटणाºया ९ जणांच्या टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून अवघ्या पाच दिवसांतच दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Container looted gang seized, action in the deficit, 14 lakhs of goods seized | कंटेनर लुटणारी टोळी पकडली, आणे घाटात कारवाई, १४ लाखांचा माल जप्त

कंटेनर लुटणारी टोळी पकडली, आणे घाटात कारवाई, १४ लाखांचा माल जप्त

Next

नारायणगाव : अहमदनगर-कल्याण महामार्गावरील आणे (ता. जुन्नर) येथील घाटात कंटेनरचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून १४ लाख ४२ हजार रुपयांचा गाय छाप तंबाखूचा माल लुटणाºया ९ जणांच्या टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून अवघ्या पाच दिवसांतच दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
कंटेनरचालक अमोल दशरथ शिंदे हा गुरुवारी (दि.७) कंटेनरमध्ये (एमएच १७, बीडी २७२) संगमनेरहून गाय छाप तंबाखूच्या बॅगा, भुगी तंबाखू, मशेरी असा १४ लाख ४२ हजार ६८२ रुपयांचा माल घेऊन आळेफाटा मार्गे निपाणीकडे आणे घाटातून जात असताना अचानक मागील बाजूकडून नंबर नसलेली पांढºया रंगाची स्कोर्पिओ गाडी कंटेनर समोर आडवी घालून त्यातील आठ जण उतरले. त्यातील एकाने शिंदे याच्या डोक्याला पिस्तूलाचा धाक दाखवून खाली ओढून स्कोर्पिओ गाडीत जबरदस्तीने बसविले. एकाने कंटेनरचा ताबा घेऊन शिरूरमार्गे कंटेनर सणसवाडी येथे आणला. तेथे शिंदे यांचे हात पाय बांधून ठेवले. कंटेनरमधील सर्व तंबाखू माल दुसºया एका कंटेनरमध्ये टाकून चोरून नेला होता.
आळेफाटा पोलिसांनी ८ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. या गंभीर गुन्ह्याची दाखल पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी या घटनेची दखल घेत घेऊन या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर व सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांचे दोन पथक तयार करून, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, विजया पाटील, राजू मोमीन, महेश गायकवाड, नीलेश कदम, पोपट गायकवाड, रवी शिंगणारे, किशोर कोरडे, शंकर जम, आरुटे, चंदनशिव, लिमण, रौफ इनामदार, नितीन दळवी, सचिन गायकवाड, विद्याधर निचित, प्रमोद नवले यांच्या पथकाने पुणे, अहमदनगर, नवी मुंबई आदी जिल्ह्यांमध्ये तपास सुरू केला.
किरकोळ व घाऊक तंबाखू विक्री करणारे दुकानदार, व्यापारी यांची चौकशी करताना या पथकास खबºयाकडून माहिती मिळाली. त्या नुसार कारवाई करून मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Container looted gang seized, action in the deficit, 14 lakhs of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे