शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत टॉवरविषयी नागरिकच उतरले रस्त्यावर

By admin | Updated: August 31, 2015 04:00 IST

प्राधिकरण परिसरातील नागरी वसाहतीतील अनधिकृत मोबाईल टॉवर हटवावेत याविषयी वारंवार मागणी करूनही पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण

पिंपरी : प्राधिकरण परिसरातील नागरी वसाहतीतील अनधिकृत मोबाईल टॉवर हटवावेत याविषयी वारंवार मागणी करूनही पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कारवाई करीत नसल्याने रविवारी उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू सोसायट्यांतील नागरिकच रस्त्यावर उतरले होते. प्राधिकरण परिसरात सुमारे १०० मोबाईल टॉवर अनधिकृतपणे उभारले आहेत. या टॉवरमुळे पर्यावरण आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे, याबाबत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने आवाज उठविला होता. नवनगर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले होते. या वेळी लवकर यावर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी सुरेश जाधव यांनी दिले होते. याबाबतची बैठक होऊनही पंधरा दिवस झाले, तरी कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आज सकाळी दहाला प्राधिकरण नागरी हक्क सुरक्षा समिती, जागर नागरिक संघाचे कार्यकर्ते सेक्टर २६ मध्ये एकत्र झाले. या वेळी समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संघाचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेरी, गुणवंत चिखलीकर, मनोहर पद्मन, एम. गोपीनाथन्, रेखा गावडे यांच्यासह महिला, नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यानंतर हा मोर्चा सेक्टर २८ मधील एका टॉवरजवळ आला. पाटील म्हणाले, ‘‘अनधिकृत टॉवरबाबत प्रधिकरणास निवेदने दिली आहेत. मात्र, आजवर कार्यवाही केलेली नाही. म्हणून तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने रस्त्यावर उतरावे लागत आहे.’’ (प्रतिनिधी)