Aam Aadmi Party's victory is answer to BJP aggression: Raju Shetty | भाजपाच्या आक्रस्ताळेपणाला आम आदमी पक्षाचे उत्तर : राजू शेट्टी

भाजपाच्या आक्रस्ताळेपणाला आम आदमी पक्षाचे उत्तर : राजू शेट्टी

पुणे : ज्या आक्रस्ताळेपणाने, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण हाेईल असे राजकारण भाजपाने केले. विराेधीमत व्यक्त करणाऱ्यांना देशद्राेही ठरवले या भाजपाच्या राजकारणाला लाेकांचे प्रश्न साेडवून आम आदमी पक्षाने (आप) उत्तर दिले आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेेते राजू शेट्टी यांनी आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले. 

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये ते बाेलत हाेते. शेट्टी म्हणाले, भाजपाच्या आक्रस्ताळ, हिडीस राजकारणावर हा आपचा विजय आहे. भाजपाने जातीय ध्रुवीकरण करुन मताचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. विराेधी मत व्यक्त करणाऱ्याला देशद्राेही ठरवण्यात आले. दांभिक राष्ट्रवादाची परिसीमा गाठली हाेती. त्यात देशात मंदी, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करताना अडचणी येत आहेत. यावरुन लक्ष हटविण्यासाठी आक्रस्ताळपणा भाजपाने सुरु केला. यावर आपने शांतपणे नागरिकांचे प्रश्न साेडवले. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवल्या त्याचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देणारा प्रशासक मिळाला तर ते जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करतात हे दिल्लीच्या मतदारांनी दाखवून दिले. 

आप आणि स्वाभिमानी शेतकरी पक्ष येऊ शकतात एकत्र
आप आणि स्वाभिमानी हे नैसर्गिक मित्र आहाेत. केजरीवाला यांना 2013 ला मी सांगली ला घेऊन आलाे हाेताे. आम आदमी पक्षाची ग्रामीण भागाची भूमिका स्पष्ट झाली नव्हती म्हणून आम्ही थांबलाे हाेताे, परंतु येत्या काळात दाेन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता फेटाळता येत नाही असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले. 

Web Title: Aam Aadmi Party's victory is answer to BJP aggression: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.