शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड आणि शर्टाचं बटण ठरला महत्वाचा पुरावा ;  खुनातील आरोपीला मिळाली जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 21:18 IST

तीन साक्षीदार फितूर झाले..पण घटनेच्या ठिकाणी सापडलेले आरोपीचे आधार कार्ड,तसेच शर्टाचे बटण महत्वाचे पुरावे ठरले.

पुणे : तीन साक्षीदार फितूर झाले..पण घटनेच्या ठिकाणी आरोपीचे आधार कार्ड,तसेच शर्टाचे बटण सापडले. पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केलेल्या शर्टाचेच ते बटण असल्याचे न्यायालयात सिध्द झाले. तसेच, कपड्यावर असलेले रक्ताचे डाग आणि त्याने दाखवलेली घटनास्थळाची जागा हे परिस्थितीजन्य पुरावे, सहाय्यक जिल्हा सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.सत्र न्यायाधीश ए.एन.सिरसिकर यांनी हा आदेश दिला.

दुर्गेशनाथ गोपीनाथ गोस्वामी (वय 29, रा. लोहगाव, मूळ. राजस्थान) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. नरसिंगराम बुटाराम गर्ग असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत येरवडा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील संजय पवार यांनी सात साक्षीदार तपासले. 

ही घटना 28 ते 29 ऑक्टोबर 2018 रोजी घडली. मयत गर्ग आणि गोस्वामी दोघेही मूळचे राजस्थानचे. दोघेही चांगले मित्र.  गोस्वामी याचे फर्निचरचे काम गर्ग याने केले होते. त्याचे दोन हजार रुपये तो वारंवर मागत होता. 28 ऑक्टोबर रोजी गर्गने पैशाची मागणी केली. त्यावेळी बुधवार पेठ येथे जाऊन गोस्वामी याने त्याला 1 हजार रुपये दिले. त्यानंतर दारू पिल्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी पहाटे ते दुचाकीवरून लोहगावकडे चालले होते. त्यावेळी संगमवाडीकरून सादलबाबा चौकाकडे जाणा-या रस्त्यावर ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी दोघात पुन्हा शाब्दिक भांडण सुरू झाले. त्यावेळी गोस्वामी याने गर्ग यास शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर लाथ मारल्यानंतर बाजूला असलेल्या ओढ्यात गर्ग पडला. वरून सिमेंटचा ब्लॉक मारून गोस्वामीने मित्राचाच खून केला. खिशातील एक हजार रुपये घेऊन तो निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.-----------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीLife Imprisonmentजन्मठेपPoliceपोलिस