शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मी आबांची लेक... ते नक्की माघार घेतील : अश्विनी कदम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 13:45 IST

'ते' मला पित्यासमान असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील....

ठळक मुद्देभारतीय जनता पक्षाच्या जातीयवादी राजकारणाविरुद्ध माझा लढा : आबा बागुल

पुणे : पर्वती मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीला सुरुवात केली. यावेळी कदम म्हणाल्या, मला मतदार संघाचा अनुभव असून मी स्थानिक आहे. त्यामुळे मला स्थानिक जनतेचे प्रश्न माहिती आहेत. मतदार संघात विकास कामे झालेली नाहीत. अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. काँग्रेसचे नाराज नगरसेवक आबा बागुल यांची मी लेकच आहे. ते मला पित्यासमान असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील. आबा नक्की माघार घेतील असेही कदम यावेळी म्हणाल्या.यासंदर्भात बोलताना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला जात असलेले आबा बागुल म्हणाले, अश्विनी कदम निश्चितच मला मुलीसारख्या आहेत. त्यांनीही वडिलांची मानसिकता समजून घ्यावी. कदम यांच्यावर जेव्हा 2012 साली अन्याय झाला तेव्हा त्या सुद्धा अपक्ष लढल्या होत्या. मी कदम, राष्ट्रवादी वा काँग्रेस यांच्याविरुद्ध लढत नसून दहा वर्षे काहीही काम न करणाऱ्या विद्यमान भाजपा आमदाराशी लढणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या जातीयवादी राजकारणाविरुद्ध माझा लढा आहे. विकासकामांच्या जोरावरच मी अपक्ष लढणारच आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबत मला कोणत्याही वरिष्ठ नेत्याने संपर्क साधलेला नाही.

======राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी कदम या रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल करायला निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आल्या असता त्याच वेळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागुल सुद्धा अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. बागुल अर्ज दाखल करून येत असताना कार्यालयाच्या आवारात अश्विनी कदम आणि ते एकमेकांसमोर आले. त्यावेळी कदम यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ, प्रदेश सरचिटणीस ?ड. अभय छाजेड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार कमल ढोले पाटील, एड. जयदेव गायकवाड उपस्थित होते. बागुल यांना कंद यांनी 'हात' केला परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. यावेळी बागुल यांनी ढोले पाटील यांना मिठी मारत आशीर्वाद घेतले; परंतु अन्य नेत्यांशी बोलणे टाळले. जाता जाता नेत्यांना 'आमचे बघा किती लांब गेले.' असा टोमणा मारला

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण