शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

Live In Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणाने स्वतःच्याच हाताने गळा चिरून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 13:50 IST

गेल्या वर्षभरापासून त्याच्या मैत्रिणीसोबत धायरी येथे फ्लॅट भाड्याने घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता

धायरी : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरुणाने स्वतःच्याच हाताने कटरने गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. महेश राजाराम तवंडे (वय : ३२, ओम नमः सोसायटी, मुक्ताई नगर, रायकर मळा, धायरी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी नैराश्यातून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मूळचा कोल्हापूर येथील असणारा महेश हा पुण्यामध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता. तो गेल्या वर्षभरापासून त्याच्या मैत्रिणीसोबत धायरी येथे फ्लॅट भाड्याने घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. गणपती उत्सवापासून मैत्रीण बाहेरगावी गेली होती. दरम्यान, त्याने शुक्रवारी फ्लॅट आतून बंद करून स्वतःच्याच हाताने शरीरावर व गळ्यावर वार केले. दुपारी घरमालकाला ओरडण्याचा आवाज आला होता, परंतु नेहमीच या तरुणाच्या फ्लॅटमधून भांडणाचा आवाज येत असल्याने त्यांनी दुर्लक्ष केले. रात्री घरमालकाला संशय आल्याने त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याला माहिती दिली.

याबाबत माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आतून बंद असलेला फ्लॅटचा दरवाजा तोडला असता महेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून, सिंहगड रस्ता पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यूPoliceपोलिस