भरे येथे मुळा नदीत तरुण बुडाला, मित्रा समवेत कपडे धुण्यासाठी उतरला होता पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 21:18 IST2024-10-01T21:17:44+5:302024-10-01T21:18:20+5:30
Pune News: दसऱ्याचे कपडे धुण्यासाठी घोटावडे भरे पुलाजवळ मुळा नदीत उतरलेला तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. ही घटना 4 वाजेच्या सुमारास घडली

भरे येथे मुळा नदीत तरुण बुडाला, मित्रा समवेत कपडे धुण्यासाठी उतरला होता पाण्यात
मुळशी - तुषार बाळू गायकवाड, वय 27 वर्ष, सध्या राहणार कस्पटे वस्ती, वाकड ( मूळ गाव सोलापूर) येथील युवक दसऱ्याची कपडे धुण्यासाठी घोटावडे भरे पुलाजवळ मुळा नदीत उतरला असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. ही घटना 4 वाजेच्या सुमारास घडली असून आपत्कालीन विभाग व पोलीस प्रशासनाकडून शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे....यावेळी बिट अंमलदार गौतम लोकरे साहेब, घोटावडे चे पोलीस पाटील दीपक मातेरे, मुगावडेचे पोलीस पाटील चैतन्य वाकणकर घोटावडेचे पोलीस पाटील संदीप ववले. आदी घटनास्थळी उपस्थित होते. मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख प्रमोद बलकवडे यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी 7 वाजेपर्यंत पाण्यात उतरून शोध घेतला परंतु पाण्याचा वेग वाढता अंधार लक्षात घेऊन शोध कार्य थांबवण्यात आले. मयत तुषारचा शोध उद्या सकाळी घेणार असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास बिट अम्मलदार गौतम लोकरे हे करीत आहेत.