Pune: शारीरिक संबंधांची मागणी करून तरुणीचा मॉर्फ व्हिडिओ केला व्हायरल

By भाग्यश्री गिलडा | Updated: January 27, 2024 17:46 IST2024-01-27T17:45:41+5:302024-01-27T17:46:01+5:30

याप्रकरणी येवलेवाडी येथील तरुणीने गुरुवारी (दि. २५) कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून प्रथमेश गुळवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

A young girl's morph video went viral by demanding physical relations | Pune: शारीरिक संबंधांची मागणी करून तरुणीचा मॉर्फ व्हिडिओ केला व्हायरल

Pune: शारीरिक संबंधांची मागणी करून तरुणीचा मॉर्फ व्हिडिओ केला व्हायरल

पुणे : इंस्टाग्रामवर मेसेजकडून तरुणीकडे शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली, नंतर तिचा मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा प्रकार ११ डिसेंबर २०२३ रोजी घडला आहे. याप्रकरणी येवलेवाडी येथील तरुणीने गुरुवारी (दि. २५) कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून प्रथमेश गुळवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि आरोपी प्रथमेश गुळवे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने तरुणीला इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता. त्यामध्ये त्याने अप्रत्यक्षपणे तरुणीकडे शरीर सुखाची मागणी करून, तिला कात्रज येथे भेटण्यासाठी बोलावले होते. तरुणी कात्रज चौकात संबंधित तरुणाला भेटून विरोध केला. त्यामुळे तरुणाने तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हॉट्सॲपवर व्हायरल केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करत आहेत.

Web Title: A young girl's morph video went viral by demanding physical relations