शहरं
Join us  
Trending Stories
1
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
2
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
3
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
4
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
5
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
6
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
7
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
8
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
9
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
10
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
11
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
12
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
13
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
14
Affordable Cars: कमी पगार असूनही खरेदी करू शकता 'या' ५ स्वस्त आणि मस्त कार!
15
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
17
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
18
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
19
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
20
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तरूणाला नग्न करून नाचायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल; पोलिस म्हणतात फिर्यादीच संशयास्पद...

By भाग्यश्री गिलडा | Updated: November 10, 2023 18:48 IST

नग्न अवस्थेतील नाचतानाचा व्हिडिओ गावातील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप येरवडा परिसरात राहणाऱ्या तरुणाने केला

पुणे: तरूणाला फ्लॅटवर बोलावून घेत टोळक्याने त्याला नग्न करत नाचायला भाग पाडल्याची तक्रार येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तसेच फिर्यदिकडील ६० हजार रूपये जबरदस्तीने घेउन लुट केल्याची फिर्यादीत नोंद केली आहे. नग्न अवस्थेतील नाचतानाचा व्हिडिओ गावातील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप येरवडा परिसरात राहणाऱ्या तरुणाने केला आहे.  हा प्रकार १३ ते १४ जुलै दरम्यान घडला आहे. सोमनाथ कोंडींबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंतराव भोसले (सर्व रा. तिसगाव प्रवरानगर) यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

फिर्यादीत म्हटल्यानुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच गावचे असून मित्र आहेत. आरोपींनी १३ जुलैला फोन करून तुझा भाउ आला आहे, असे सांगून एकतानगरमधील फ्लॅटमध्ये फिर्यादीला बोलावले. त्याठिकाणी फिर्यादीला कपडे काढून नग्न होउन नाचायला भाग पाडले. त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडील ६० हजारांची रोकड काढून घेतली. त्याशिवाय त्याचा मोबाइल जाळून टाकला. तरूणाचा व्हिडिओ गावाकडील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केला. याप्रकरणी फिर्यादी तरूणाने उशिरा तक्रार दिल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीची भूमिका संशयास्पद 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फिर्यादी हा एका बँकेत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. लोन काढून देण्यासाठी पैश्यांची मागणी करतो. मात्र पैसे घेतल्यावर लोन काढून देत नाही त्यामुळे त्याच्यात आणि लोन घेणाऱ्यांमध्ये भांडण होतात. काही दिवसांपूर्वी बंद गार्डन पोलीस ठाण्यात फिर्यादीने अशीच एक तक्रार दाखल केली होती. त्यामुळे फिर्यादीच संशयास्पद असल्याचा पोलिसांना संशय आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलMONEYपैसा