Pune Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडिओ केला व्हायरल; गुन्हा दाखल
By भाग्यश्री गिलडा | Updated: October 19, 2023 17:53 IST2023-10-19T17:52:40+5:302023-10-19T17:53:22+5:30
या प्रकरणी सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या सुशांत अशोक गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Pune Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडिओ केला व्हायरल; गुन्हा दाखल
पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अश्लिल व्हिडिओ शेयर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या सुशांत अशोक गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान घडला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने पर्वती पोलिसांना फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, तक्रारदार यांची १७ वर्षांची मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे होते. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आरोपी गायकवाड याने तिला खडकवासला येथे फिरायला नेले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून दांडेकर पूल परिसरात असलेल्या लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध करून व्हिडिओ काढला.
मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हाॅट्सॲपवर व्हायरल केला. या प्रकरणी सुशांत गायकवाड याच्याविरोधात पर्वती पोलिस ठाण्यात पॉक्सो ॲक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक खोमणे हे करत आहेत.