शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी निघालेल्या दुचाकीस कंटेनरची धडक; एकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 12:17 IST

कंटेनर चालकावर गुन्हा दाखल

शेलपिंपळगाव : बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी निघालेल्या दुचाकीस चाकण - शिक्रापूर राज्यमहामार्गावर साबळेवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला. सदरची घटना शनिवारी (दि.१८) सकाळी अकराच्या सुमारास साबळेवाडी येथील धोकादायक वळणावर घडली. अपघातात बहुळ ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष दत्तात्रय साळुंके (वय ५४ रा. बहुळ ता.खेड) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत दशरथ रामभाऊ वाडेकर (वय ५८ रा.बहुळ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.       चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दशरथ वाडेकर व सुभाष साळुंके हे दोघेजण स्वतःकडील दुचाकीवरून सणसवाडी येथे बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी चालले होते. दरम्यान साबळेवाडी हद्दीतील धोकादायक वळणावर पाठीमागून येणाऱ्या अवजड कंटेनरने दुचाकीस धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. यामध्ये सुभाष साळुंके हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी नागरिकांच्या मदतीने त्यांना प्राथमिक उपचारासाठी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूBull Cart Raceबैलगाडी शर्यतhospitalहॉस्पिटल