शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील कोयता प्रकरणाला ट्विस्ट! तरुणीकडून ४ लाखाची फसवणूक अन् हत्येचा थरार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 20:47 IST

शुभदा कोदारेने आपल्या वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगत वेळोवेळी कंपनीतील कलीग...

पुणे - पुण्यातील येरवडा परिसरात शुभदा कोदारे खून प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुभदा आणि तिचा मारेकरी कृष्णा हे एकाच कंपनीत कार्यरत होते. शुभदाने खोटं बोलून वेळोवेळी कृष्णाकडून पैसे उकळल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभदा कोदारेने आपल्या वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगत वेळोवेळी कंपनीतील कलीग असलेल्या कृष्णा कनोजा याच्याकडून तब्बल ४ लाख रुपये उकळले होते. माझे वडील आजारी आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे, असे सांगत तिने कृष्णाकडून पैसे घेतले.

सुरुवातीला शुभदाच्या या खोट्या कथानकावर कृष्णा विश्वास ठेवत तिला पैसे देत राहिला, पण जेव्हा तिने अधिक पैसे मागण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला संशय आला.अशात कृष्णाने, सत्य जाणून घेण्यासाठी शुभदाचे मूळ गाव कराड गाठले. तिथे शुभदाचे वडील ठणठणीत असल्याचे समोर आले. "मी अजिबात आजारी नाही आणि माझ्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली नाही," असे शुभदाच्या वडिलांनी कृष्णाला स्पष्ट सांगितले.

यामुळे आपला विश्वासघात झाल्याचा राग कृष्णाच्या मनात निर्माण झाला. पुण्यात परतल्यानंतर त्याने शुभदाकडे पैसे परत देण्याची मागणी केली. यातून दोघांमध्ये अनेक वेळा वादावादी देखील झाली.

अशातच मंगळवारी, कृष्णाने शुभदाला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने कंपनीच्या पार्किंगमध्ये गाठले. वादानंतर कृष्णाने तिच्यावर धारदार कोयत्याने वार केले. शुभदाच्या उजव्या हाताच्या नसांवर झालेल्या गंभीर जखमेने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. तिची शुगर कमी झाल्याने रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. चतु:श्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी कृष्णा कनोजा याला अटक केली आहे. या हल्ल्यामागे विश्वासघातामुळे झालेला राग आणि संताप होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसITमाहिती तंत्रज्ञान