शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

लोणी ते मंचर रस्त्यावर सिमेंट गोणी घेऊन जाणारा ट्रक पलटी; चालक व इतर दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 12:35 IST

रस्त्याची दुरुस्ती रखडल्याने वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे

पुणे : लोणी ते मंचर (ता.आंबेगाव ) रस्त्यावर निरगुडसर फाटा नजदिक हांडेवस्ती जवळ सिमेंट ट्रक सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मंचर कडून लोणी कडे जात असताना पलटी झाला. या अपघातात ट्रक ड्रायव्हर व इतर दोनजण जखमी झाले आहेत.

लोणी ते मंचर रस्त्यावर निरगुडसर फाटा व हांडे वस्ती नजदिक रस्त्याचे सिमेंटकॉक्रिटचे काम चालू आहे. निरगुडसर फाटा नजदिक काम पूर्ण झाले आहे. पण हांडे वस्तीजवळ रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटचे काम संथ गतीने चालू आहे. शिवाय एकाच बाजूचा रस्ता पूर्ण झाल्याने मोठ्या वाहनांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर सध्यातरी वाहतूकीची मोठी समस्या आहे. या रस्त्यावर आज एक सिमेंट मिक्सर टँकर पलटी झाला होता. तसेच रात्री एक चार चाकी वाहनही रस्त्याच्या बाजूला साईड पट्ट्या व्यवस्थित भरल्या नसल्याने खाली गेली होती. त्यावेळेस स्थानिक तरुणांनी ती चार चाकी गाडी उचलून व्यवस्थित रस्त्यावर आणली. त्यानंतर आज दिनांक २८ रोजी पुन्हा सकाळी मंचर वरून सिमेंट गोणी भरून लोणी या ठिकाणी चाललेल्या ट्रक पलटी झाला आहे. 

या अपघातात ट्रकचालक सुखदेव भेके (वय ५२) ,संदिप इंदोरे (वय ३८), गणपत पारधी ( सर्व रा. मंचर ता.आंबेगाव ) हे जखमी झाले आहेत. लोणी,पाबळ वरून मंचरला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने लहान मोठ्या वाहनाची मोठी वर्दळ असते. तरी सार्वजानिक बांधकाम विभाग व सबंधित ठेकेदार याने रस्त्याचे उर्वरीत काम त्वरीत चालू करावे, रस्त्याच्या साईटच्या साईट पट्ट्या व्यवस्थित भरून घ्याव्यात अशी मागणी पोलीस पाटील विठ्ठल वळसे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष युवराज हांडे यासह ग्रामस्थ व वाहन चालकांनी केली आहे. दरम्यान रस्त्याची दुरुस्ती लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरambegaonआंबेगावAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्ग