शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण नगर महामार्गावर म्हशी घेऊन जाणारा टेम्पो पलटी; ८ म्हशींचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 13:19 IST

दोन म्हशी गंभीर जखमी असून चालकासह दोघे जण जखमी

पिंपरी पेंढार : कल्याण नगर महामार्गावर पिंपरी पेंढार (ता.जुन्नर) परिसरात म्हशी घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला आहे. अपघातात आठ म्हशींचा मृत्यू झाला असून दोन म्हशी गंभीर जखमी आहेत. तर चालकासह दोघेजण जखमी झाली आहेत. ही घटना मंगळवार (दि 10) रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली.   मुंबई येथून कल्याण नगर महामार्गाने म्हशी घेऊन जाणारा टेम्पो पिंपरी पेंढार परिसरातील साईनगर येथील वळणदार ठिकाणी आला असता चालकाचा टेंम्पोवरील ताबा सुटल्याने तो रस्ताचे लगत असलेल्या खड्यात जाऊन पलटी झाला. या दुर्घटनेत टेम्पोत भरलेल्या १० म्हशींपैकी ८ म्हशी जागीच मृत्यू झाला तर चालक व आणखी एकजण जखमी झाल्याची माहिती ओतुर पोलीस सूत्रांनी दिली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.           अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ता तळपाडे, संदीप भोते, शाम जायभाय, अमोल पालवे घटनास्थळी हजर झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश खिल्लारी व डॉ. कैलास लुधरकर यांनी म्हशींची तपासणी करून ८ म्हशी मृत असल्याचे घोषित केले. तर दोन गंभीर झाल्या याबाबत अधिकचा तपास ओतूर पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलJunnarजुन्नरDeathमृत्यू